Shani Vakri 2024 : सूर्य पुत्र शनि महाराजांच्या कृपेने एखाद्या व्यक्तीचं भाग्य उजळू शकतं. पण जेव्हा शनि (Shani) नाराज होतो, तेव्हा राजालाही कंगाल व्हायला वेळ लागत नाही. मात्र, शनिदेव केवळ चूक करणाऱ्यांनाच शिक्षा देतात.


यासोबतच, शनीचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो हे शनीच्या हालचालीवर अवलंबून आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे, जो एकाच राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो.


शनि वक्री कधीपासून कधीपर्यंत? (Saturn retrograde 2024)


सध्या शनि कुंभ राशीत वक्री स्थितीत आहेत. कुंभ ही शनिदेवाची मूळ राशी आहे. 29 जून 2024 रोजी शनि कुंभ राशीत वक्री झाला आणि 15 नोव्हेंबरनंतर शनि सरळ चालीत मार्गी होईल. शनीची वक्री स्थिती ज्योतिषशास्त्रात शुभ मानली जात नाही.


वक्री स्थितीतील शनि अनेक लोकांसाठी त्रासदायक ठरतो. विशेषत: जे लोक शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली असतात आणि जे लोक चुकीची कामं करतात, त्यांना या काळात शनिदेव शिक्षा देतात. त्यामुळे या काळात असं कोणतंही काम करू नये, ज्यामुळे तुम्हाला शनिदेवाच्या नाराजीला सामोरं जावं लागेल. शनीची वक्रदृष्टी असताना नेमकी कोणती कामं करू नये? जाणून घेऊया .


शनि वक्री असताना कोणती कामं करू नये?



  • जे लोक आधीच शनीच्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत, त्यांनी शनीच्या वक्री काळात कोणताही नवीन व्यवसाय किंवा कुठलंही शुभ काम सुरू करू नये. कारण शनिदेवाच्या उलट ऊर्जेमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याची शक्यता कमी आहे.

  • शनिदेव वक्री काळात लोकांची परीक्षा घेत असतात, त्यामुळे यावेळी आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडा आणि चोरीसारखी चुकीची कामं करू नका.

  • न्यायाचा देव शनि जेव्हा उलट फिरत असतो, तेव्हा लोकांनी सर्व प्रकराच्या लोभापासून दूर राहावं. शनिदेव लोभी लोकांवर कोपतात आणि त्यांना कठोर शिक्षा देतात.

  • शनीच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी वृद्ध, महिला, गरीब, मजूर, जनावरं यांना त्रास देऊ नये. या काळात त्यांना वेदना किंवा त्रास होईल असं काहीही करू नका, अन्यथा शनीचा प्रकोप होतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Dev : अवघ्या 3 दिवसांत शनी बदलणार चाल! 'या' 3 राशींच्या इच्छा होणार पूर्ण; अनेक कामं लागतील मार्गी