Shani Dev: न्यायदेवता म्हटल्या जाणाऱ्या शनिदेवाला (Shani) प्रसन्न करण्यासाठी शनिवारी त्यांची विशेष पूजा केली जाते. वास्तविक शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. असे म्हटले जाते की केवळ मानवच नाही तर विश्वाचा निर्माता देखील शनिदेवाच्या वाईट नजरेपासून वाचू शकत नाही. निसर्गाच्या संतुलनासाठी  त्यांना निसर्गाचे नियम पाळावे लागतात. पौराणिक कथेनुसार भगवान शंकर देखील शनिदेवाच्या वाईट नजरेपासून वाचू शकले नाहीत. जर शनिदेव एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि  भरभराट येते.  तर दुसरीकडे शनिदेव कोणावर कोपले तर त्यांच्या आयुष्यात कोणतेही काम पूर्ण होत नाही. कोणत्याच कामात यश मिळत नाही. 


महादेवाला जगाचा पालनहार म्हटले जाते. भोलेनाथाची आराधना करणाऱ्याला भगवान शिव आशीर्वाद देतो. मात्र जगाच्या पालनहार असणाऱ्या भगवान शंकरावर देखील शनीची वक्रदृष्टी पडली होती. यावर तुमचा विश्वास नाही बसणार पण भगवान शंकरावर शनीची वक्रदृष्टी या संदर्भात एक पौराणिक कथा आहे. कथेनुसार एकदा शनिदेव आपल्या भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले . त्यांनी प्रथम भगवान शंकाराला  प्रणाम करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला.त्यानंतर शनिदेवाने भगवान शिवाला नम्रपणे सांगितले की, उद्या तुमच्या राशीवर वक्रदृष्टी असणार आहे.   यावर भोलेनाथ आश्चर्यचकित झाले आणि शनिदेवाची दृष्टी किती काळ आपल्या राशीत राहील अशी विचारणा केली. 


भगवान शंकराने घेतले हत्तीचे रुप


यावर शनिदेव म्हणाले की, सव्वा प्रहर तुमच्यावर माझी वक्रदृष्टी असणार आहे.शनिदेवाचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथ आपल्या वाईट नजरेपासून  वाचवण्यासाठी विचार करु लागले.  दुसऱ्या दिवशी ते कैलास पर्वतावरून पृथ्वीवर आले. शनीच्या वक्रदृष्टीपासून वाचण्यासाठी भगवान शंकराने हत्तीचे रुप धारण केले. सूर्यास्तानंतर वक्रदृष्टीचा  काळ  संपल्यानंतर  भगवान शिव आपल्या मूळ रूपात आले आणि आनंदाने कैलास पर्वतावर परतले. 


शनिदेवाने भोलेनाथाची मागितली माफी


जेव्हा भगवान शिव कैलास पर्वतावर पोहोचले तेव्हा तेथे शनिदेव आधीच उपस्थित होते. यावर भगवान शंकराने शनिदेवाकडे पाहून सांगितले की तुझ्या वक्रदृष्टीचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही.त्यावर शनिदेवांनी पालनहार महादेवाची क्षमा मागितली. क्षमा मागितल्यावर भगवान शंकर म्हणाले, माझ्या वक्रदृष्टीमुळे तुम्हाला हत्तीचे रुप घ्यावे लागले आणि पृथ्वीवर वास करावा लागला. शनिदेवाचे हे शब्द ऐकून भगवान भोलेनाथ हसले आणि त्यांनी शनिदेवाला आशीर्वाद दिला. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :