Shani 2024: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, कारण ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. शनीच्या स्थितीच्या दृष्टीने पाहिल्यास, 2024 हे वर्ष खूप खास असणार आहे. पुढील वर्षी शनीच्या स्थितीत तीन महत्त्वाचे बदल होतील. सर्वप्रथम, 11 फेब्रुवारी 2024 रोजी शनि कुंभ राशीमध्ये अस्त होईल. त्यानंतर 18 मार्च 2024 रोजी कुंभ राशीत शनिचा उदय होईल.


यानंतर 29 जून 2024 रोजी शनिदेव प्रतिगामी होणार आहे. शनिच्या (Shani) या हालचाली आणि स्थितीतील बदल सर्व राशीच्या लोकांवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पाडतात. 2024 मध्ये शनिच्या बदलत्या चालीचा 3 राशींवर खूप शुभ परिणाम होईल आणि या लोकांचं नशीब उजळेल. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठं यश मिळू शकतं. 2024 वर्षातील भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


शनिदेवाच्या चालीतील बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असेल. नववर्षात तुम्हाला अनेक लाभ मिळतील. नोकरी आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमच्या सध्याच्या नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते. पगारात वाढ होईल. तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपतील. बँक बॅलन्स वाढेल. व्यवसायात नफा वाढेल. मोठा करार निश्चित होऊ शकतो. तुम्ही देश-विदेशात प्रवास कराल. 


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी शनीच्या दृष्टीकोनातून 2024 हे वर्ष खूप फायदेशीर असणार आहे. तुम्ही काही नवीन काम सुरू कराल. नोकरी करणाऱ्यांना जुन्या समस्यांपासून दिलासा मिळेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी खूप प्रगती होईल. नवीन नोकरी मिळू शकते. व्यावसायिक भागीदारीमुळे कामात लाभ होईल. कोर्ट केसेसमध्ये तुमचा विजय होईल. शत्रूंवर विजय मिळेल. 


कुंभ रास (Aquarius)


शनि सध्या कुंभ राशीत आहे आणि 2024 मध्येही कुंभ राशीत राहील. कुंभ राशीमध्ये शनीचा अस्त होईल, उदय आणि मार्गी होईल. या सर्व बदलांचा कुंभ राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल. उच्च पदावरील लोकांशी संपर्क साधाल. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. मार्च महिन्यानंतर तुमची कमाई वाढेल. या राशीच्या लोकांना मागील अनेक समस्यांपासून आराम मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Shani Dev : नव्या वर्षात जगाला सतावणार शनीची डोकेदुखी; भारतात नैसर्गिक आपत्तीसह राजकीय संकटांचा उद्रेक