Shani Dev : हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस हा कोणत्या न कोणत्या देवी देवतांना समर्पित आहे, त्याच प्रमाणे शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिवारच्या दिवधी शनिदेवाची विधीवत पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, असं मानलं जातं. परंतु शनिवारच्या दिवशी काही गोष्टी करण्यास मनाई आहे. शनिवारी केलेल्या काही गोष्टींमुळे शनिदेव (Shani Dev) क्रोधित होतात आणि माणसाची अधोगती होण्यास सुरुवात होते. शनिवारी नेमक्या कोणत्या गोष्टी टाळाव्या? जाणून घेऊया


शनिवारी 'ही' कामं करू नका


शनिवारी केस धुवू नका किंवा दाढी करू नका


काही लोकांना दररोज केस धुण्याची सवय असते, मात्र शनिवारच्या दिवशी चुकूनही केस धुवू नये. शनिवारच्या दिवशी दाढी देखील करू नये, पार्लरमध्ये जावून केस कापू नये, अन्यथा शनि दोष निर्माण होतो.


शनिवारी नखं कापू नये


शनिवारच्या दिवशी नखं कापू नये, अन्यथा त्याचा घरावर वाईट परिणाम होतो. शनिवारी नखं कापल्यास घरात दारिद्र्य येते.


चुकूनही मोहरीचं तेल खरेदी करू नका


ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी मोहरीचे तेल किंवा इतर कोणतंही तेल खरेदी करू नये. या दिवशी तेल खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते, या दिवशी तेलाचं दान केलेलं चांगलं असतं. शनिवारी विशेषतः मोहरीचं तेल दान करणं शुभ मानलं जातं.


मीठ खरेदी करू नका


शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलासोबत मीठही घरी आणू नये. शनिवारी मीठ घरी आणणं अशुभ मानलं जातं. या दिवशी मीठ घरी आणल्याने घरावरील कर्ज वाढतं आणि तुम्हाला अनेक रोग बळावू शकतात. शनिवारी तुम्ही मीठ विकत आणूही नये किंवा घरातील मीठही कुणाला देऊ नये, असं केल्याने तुमच्यावरील कर्ज वाढतच जातं.


शनिदेवाच्या डोळ्यात पाहू नये


शनिवारी शनि मंदिरात जात असाल तर लक्षात ठेवा की चुकूनही त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहू नये. असं करणं हा शनिदेवाचा अपमान मानला जातो आणि यामुळे शनिदेव नाराज होतात.


मांसाहार करू नका


शनिवारी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये. शनिवारी कोणत्याही प्राण्याला मारल्याने किंवा यातना पोहोचवल्याने शनीचा कोप होतो. शनिवारी गरजूंची शक्य तितकी मदत करावी, यामुळे तुम्हाला शनीचा आशीर्वाद प्राप्त होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Dev : शनि उदयानंतर 'या' 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू; कमावणार बक्कळ पैसा, बँक बॅलन्स वाढणार