Shani Surya Yuti : शनिवार हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित दिवस आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत शनि अशुभ किंवा सूर्य कमजोर आहे, त्यांच्यासाठी 25 फेब्रुवारी 2023 हा विशेष दिवस आहे. आजच्या दिवशी पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. या दिवशी भरणी नक्षत्र राहील. चंद्र मेष राशीत भ्रमण करत आहे. या दिवशी कोणते उपाय आहेत ज्यामुळे सूर्य आणि शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचू शकतो? जाणून घ्या
तूळ राशीच्या लोकांवर सूर्य-शनि युतीचा परिणाम काय होणार?
ज्योतिषशास्त्रानुसार जेथे तूळ राशीमध्ये शनि उच्चस्थानी असतो आणि शुभ फळ देतो, त्या राशीमध्ये सूर्य कमजोर होतो. जेव्हा एखादा ग्रह दुर्बल राशीत असतो तेव्हा तो शुभ परिणाम देत नाही त्यावेळी तो त्या ग्रहाशी संबंधित समस्या देतो. म्हणूनच तूळ राशीच्या लोकांनी 25 विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
कामात अडथळे निर्माण होण्याची स्थिती
सूर्य आणि शनीच्या युतीमुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमचे ऑफिस किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात केलेल्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळणार नाही. यासोबतच तुम्ही जिथे काम करता, तिथे स्पर्धक तुमच्या प्रतिमेवर परिणाम करू शकतात. घरातील सदस्यांसोबतही मतभेदाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
उपाय : शनिवारी शनि मंदिरात शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. शनि चालिसाचे पठण करा. यानंतर शनिदेवाशी संबंधित वस्तू दान करा.
मेष राशीच्या लोकांनी विशेष दक्षता घ्या
जेव्हा शनि मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा तो येथे नीच स्थानी येतो. मेष राशीमध्ये शनिची स्थिती शुभ आणि फलदायी मानली जात नाही. शनि न्यायाची देवता आहे. ते कर्माचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच चुकीची कामे टाळण्याची गरज आहे, अन्यथा शनि दंडाचे काम करतो. शनि-रवि युती तुमच्यासाठी काही मानसिक तणावासारखी परिस्थिती निर्माण करू शकते. जे लोक विवाहासाठी पात्र आहेत त्यांच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येऊ शकतात. वाणीवर संयम ठेवावा लागेल. अन्यथा, परस्पर संबंध बिघडू शकतात. विद्यार्थ्यांना चुकीच्या संगतपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय : शनिवारी सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यानंतर दूध अर्पण करावे. शनि मंत्राचा जप करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या