Shani Dev : ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाचा (Shani Dev) वाईट प्रभाव टाळण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. शनिवारी केलेल्या काही उपायांनी शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्याबद्दल जाणून घ्या.


कलियुगात शनिपूजेला खूप महत्त्व


ज्योतिषशास्त्रात शनीला क्रूर ग्रह म्हटले आहे. सूर्याचा पुत्र शनिदेव न्यायप्रिय असून ते सर्वांना त्यांच्या कर्माचे फळ देतात. शनि प्रकृतीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. कलियुगात शनिपूजेला खूप महत्त्व आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी साडेसाती किंवा ढैय्या चालू असेल तर त्याच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येतात. शनिदेवाचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. शनिवारी केलेल्या काही उपायांनी शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. त्याबद्दल जाणून घ्या.


 


शनिवारी करा हे उपाय, शनिदेव होतील प्रसन्न


शनिवारी रात्री डाळिंबाची फांदी रक्तचंदनात बुडवून एका कागदावर 'ॐ ह्वीं' मंत्र लिहून दररोज पूजा करावी. यातून ज्ञान आणि बुद्धी मिळते.


शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी, काळी गाय आणि काळ्या पक्ष्याला धान्य खाऊ घाला. यामुळे शनि ग्रहाची अशुभ दृष्टी दूर होऊन माणसाचे वाईट कर्म नष्ट होतात.


शनिवारी मुंग्यांना पीठ किंवा माशांना धान्य खाऊ घातल्यास नोकरीत प्रगती होते.


शनिवारी उडीद, लोखंड, तेल, तीळ, काळे कापड यांसारख्या शनिशी संबंधित वस्तूंचे दान करावे. यामुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो.


शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी आपल्या मधल्या बोटात काळ्या घोड्याची नाल किंवा खिळ्याने बनवलेली अंगठी घाला. हा उपाय शनीच्या प्रकोपापासून रक्षण करतो.


शनिवारी सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करावे. यानंतर सात वेळा प्रदक्षिणा करून सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडासमोर दिवा लावावा. यामुळे तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल आणि शनिदोषापासून मुक्ती मिळेल.


काळ्या रंगाचे कपडे आज परिधान करावेत. कमकुवत व्यक्ती आणि वडीलधाऱ्यांचा आदर केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात. कर्मचाऱ्यांना प्रसन्न ठेवून शनिदेवाचा आशीर्वादही मिळतो.


शनिवारी मद्य आणि मांसाचे सेवन करू नये. या दिवशी मीठ, लाकूड, रबर, लोखंड, काळे कापड, काळी उडीद, शाई, झाडू, कात्री अशा वस्तू खरेदी करू नयेत.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Weekly Horoscope 27 February to 5 March 2023 : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 'या' भाग्यशाली राशी असतील, देवी लक्ष्मीचा राहील आशीर्वाद! साप्ताहिक राशीभविष्य