Conjunction Of Saturn And Venus 2024 : शुक्र दर 26 दिवसांनी त्याची चाल बदलतो. शुक्र हा धन, समृद्धी, आनंद, आदर, आकर्षण आणि प्रेमाचा कारक मानला जातो. शुक्राच्या राशी बदलामुळे करिअर, व्यवसाय, शिक्षण, लव्ह लाईफ, वैवाहिक जीवन तसेच आर्थिक परिस्थितीमध्ये बदल दिसतो. डिसेंबरच्या शेवटी शुक्र (Venus) कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे शनि (Saturn) आधीच उपस्थित आहे.


पंचांगनुसार, शुक्र 28 डिसेंबर रोजी रात्री 11:48 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल. शनि आधीच या राशीत स्थित आहे. तब्बल 30 वर्षांनंतर शनि आणि शुक्राची युती होत आहे, ज्याचा सर्वाधिक फायदा 3 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


शुक्र आणि शनीची युती या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं, तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरीही मिळू शकते. कामातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. यश तुमच्या पायाशी असेल. व्यवसायातही तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यवसाय करण्याची संधी देखील मिळू शकते, यातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. या काळात तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुमच्या बऱ्याच दिवसांपासून राहिलेल्या इच्छा आता पूर्ण होऊ शकतात. तुम्ही भविष्यासाठी चांगली बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.


वृषभ रास (Taurus)


शुक्र आणि शनीचा संयोग वृषभ राशीच्या दशम भावात होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं, तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होण्याबरोबरच मान-सन्मानात वाढ होईल. रखडलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होऊ शकतं. या काळात तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल, तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुम्ही मित्र किंवा कुटुंबासह सहलीला जाऊ शकता, हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असू शकतो. या काळात तुमची लव्ह लाईफ सुद्धा चांगली असणार आहे. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य चांगलं राहील. बदलत्या हवामानाबाबत थोडी काळजी घेण्याची गरज आहे.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीची युती खूप फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नवीन नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. तुमचा समाजात मान-सन्मान वाढू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. पण पैसे खर्च करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Margi 2024 : शनीची सरळ चाल 'या' 3 राशींवर पडणार भारी; नोव्हेंबरपासून सर्वच कामं खोळंबणार, आर्थिक अडचणी वाढणार