Shani Shukra Yog 2025: तसं पाहायला गेलं तर येणारा प्रत्येक दिवस खास असतो. हा दिवस येताना एक नवी आशा, उमेद घेऊन येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, 7 जून 2025 ही तारीख अत्यंत खास असणार आहे. कारण या दिवशी सकाळी शुक्र आणि शनि द्विद्वादश योग बनवत आहेत. तसेच, शनि उत्तरभाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या ते दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. या युतीचा विशेषतः 5 राशींच्या करिअर, संपत्ती आणि नातेसंबंधांवर सकारात्मक परिणाम होईल. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया, या कोणत्या राशी आहेत?
द्विद्वादश योग कसा बनतो?
जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून द्वितीय (2 रे घर) आणि द्वादश (12 वे घर) या स्थानांवर असतात, तेव्हा त्यामध्ये “द्विद्वादश योग” तयार होतो. सोबत ते एकमेकांच्या 30 डिग्री अंतरावर असतात. हा शुभ आणि दुर्मिळ योग 7 जून 2025 ला बनत आहे
यामध्ये शनी आणि शुक्र असतील तर?
शनी: न्याय, शिस्त, कर्मशुक्र: सौंदर्य, कला, संपत्ती
शनी आणि शुक्र जर द्विद्वादश संबंधात असतील, तर काही वेळा ते धन, यश, न्यायप्रियता, सुंदरता व ऐश्वर्य याचे योग तयार करू शकतात.
शनि-शुक्राचा द्विद्वादश योग 'या' 3 राशींसाठी उत्तम, भाग्योदयकारक!
मकर राशीसाठी शुभ काळ
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि शनीच्या द्विद्वादश योगामुळे मकर राशीच्या व्यक्तींना सध्या अतिशय अनुकूल काळ अनुभवायला मिळू शकतो. नोकरीतील संधी आणि व्यवसायातील प्रगतीमुळे आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण शांततामय राहील आणि आपल्या माणसांसोबत वेळ चांगला जाईल. दीर्घकाळापासून चालू असलेल्या अडचणी आता मागे पडतील. विवाहासाठी योग्य साथीदाराची संधी मिळू शकते. धर्म, अध्यात्म किंवा पारंपरिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढेल. तुमची चातुर्य आणि निर्णयक्षमता तुम्हाला अनेक ठिकाणी यश मिळवून देईल.
मेष राशीसाठी विशेष शुभ काळ
शुक्र आणि शनिचा द्विद्वादश राजयोग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक किंवा समाजातील उच्च पदस्थ व्यक्तींशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील. मुलांकडून निर्माण झालेल्या समस्यांना सहज मार्ग मिळेल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. व्यवसायात आर्थिक फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे. जीवनात नवा उत्साह, आनंद आणि मानसिक शांती निर्माण होईल. आर्थिक अडचणी दूर होतील, आणि थांबलेली कामे मार्गी लागतील. तुम्ही अधिक शिस्तबद्ध जीवन जगण्याकडे वळाल, आणि त्याचा परिणाम तुमच्या यशात नक्कीच दिसून येईल.
कुंभ राशीसाठी यशाचे नवे पर्व
कुंभ राशीच्या लोकांसाठी द्विद्वादश राजयोग शुभ फलदायी ठरणार आहे. याचसोबत शनिची साडेसाती अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे अनेक त्रासमुक्तीचा अनुभव येण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि नवीन सकारात्मक वळणे येऊ शकतात. शिक्षण, अभ्यास, परीक्षा किंवा शैक्षणिक क्षेत्रात मोठा लाभ होऊ शकतो. तुम्ही आजवर प्रामाणिकपणे, मेहनतीने काम केले असेल, तर आता त्या परिश्रमाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. सतत कष्ट करणाऱ्या व्यक्तींना या काळात मोठ्या प्रमाणात यश आणि सन्मान मिळू शकतो.
हेही वाचा :
9 जूनला शनिदेवांचा पॉवरफुल राजयोग बनणार, 'या' 3 राशींवर कुबेर करणार धनवर्षा, इच्छा पूर्ण होतील
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.