Bhadra And Malavya Rajyog 2025 : वैदिक पंचांगानुसार, ग्रह एका ठराविक अंतराने संक्रमण करुन शुभ योग आणि राजयोग निर्माण करतात. याचा प्रभाव मानवासह देश-विदेशात होतो. जून महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात दोन महापुरुष राजयोग जुळून येणार आहेत. यामुळे 29 जून रोजी शुक्र ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत संक्रमण करुन मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे तब्बल 100 वर्षांनंतर भद्र आणि मालव्य राजयोग जुळून येणार आहे.
या राजयोगादरम्यान काही राशींच्या लोकांचं नशीब बदलणार आहे. या राशींच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. या शुब राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी भद्र आणि मालव्य राजयोगाचं जुळून येणं फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या बाराव्या चरणात हा भाव जुळून येणार आहे. या कालावधीत तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर चांगला वेळ घालवाल. परदेशात जाण्याची संधी निर्माण होईल. तसेच, तुमची निर्णयक्षमता दिसून येईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा शुभ योग फार लाभदायी ठरणार आहे. कारण बुध ग्रह या राशीच्या चतुर्थ चरणात तर शुक्र ग्रह तिसऱ्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला मुलांकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. जर तुम्हाला नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी भद्र आणि मालव्य राजयोग फार भाग्याचा ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगले बदल दिसून येतील . तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, नोकरीत प्रमोशन देखील मिळू शकतं. तुम्हाला जर नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही सुरु करु शकता.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
