Grah Gochar: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करताच राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. फेब्रुवारी  महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर मार्च महिना सुरू होणार आहे. मार्च महिना ग्रह- नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ग्रहांच्या संक्रमणादरम्यान, जेव्हा दोन किंवा अधिक ग्रह एकाच राशीमध्ये एकत्र येतात तेव्हा त्याला ग्रहा संयोग म्हणतात.ग्रहांच्या संयोगाचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो.  मार्चमध्ये तब्बल 30 वर्षानंतर कुंभ राशीत  कुंभ राशीमध्ये शनी आणि शुक्राचा संयोग होणार आहे. 7 मार्चला शु्क्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे कुंभ राशीत शनी, शुक्र आणि  सूर्य यांचा त्रिग्रही योग होत आहे. हा योग काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या काळात या राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे.  जाणून घेऊया त्या लकी राशी कोणत्या आहेत.


वृषभ  (Taurus) 


कुंभ राशीत शुक्र-शनि संयोग निर्माण झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना शुभ लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे.  ज्यामुळे करियर आणि महत्वाच्या कामात नवीन संधी आणि यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. . आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्हाला अपेक्षित काम मिळेल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल.


मकर  (Capricorn) 


शनी आणि शुक्र यांच्या संयोगामुळे मकर राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक लाभाच्या उत्तम संधी मिळतील. वैवाहिक जीवन चांगले राहील.  


मिथुन (Gemini) 


शुक्र आणि शनीच्या युतीमुळे मिथुन राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील. तुमच्या प्रेम जीवनात उत्साह आणि आनंद असेल. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या कामात तुम्हाला तुमचे नशीब साथ देईल ज्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होतील. समाजात तुम्हाला मान आणि सन्मान  मिळेल. नोकरी आणि वैयक्तिक जीवनात शांतता आणि प्रगती होण्याची शक्यता आहे.


कुंभ (Aquarius )


तुमच्या राशीमध्ये शनि आणि शुक्र यांच्या संयोगामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम यश मिळेल. तुम्हाला जीवनात सकारात्मक आणि चांगली बातमी मिळेल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते आणि जीवनात सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. लोकांशी चांगले संबंध येतील. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा: