Shani Parivartan 2023 : वर्षातील दुसरे सूर्यग्रहण (Suryagrahan 2023) 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. हा दिवस खूप खास आहे. हा दिवस सर्वपित्री अमावस्या तिथीचा आहे. या दिवशी पितृ पक्षाची (Pitru Paksha 2023) समाप्ती होईल. हा दिवस श्राद्धाचा शेवटचा दिवस आहे. पितृपक्षातील 15 दिवसात जर तुम्ही तुमच्या पितरांना तर्पण देऊ शकत नसाल तर, सर्वपित्रीच्या दिवशी तर्पण देऊ शकता. याशिवाय या दिवशी सूर्यग्रहणही होणार आहे. यासोबतच या दिवशी शनिही आपल्या राशीत बदल करेल. वेळोवेळी सर्व ग्रह आपली राशी आणि नक्षत्र बदलतात. ज्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो.
शनीच्या या परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर
सूर्यग्रहणानंतर काही तासांनी न्यायदेवता शनि आपले नक्षत्र बदलणार आहे. शनीच्या या परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होईल. हे काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ सिद्ध होऊ शकते. शनि नक्षत्र बदलल्याने काही राशींवर शुभ प्रभाव पडणार आहे. शनीच्या या बदलामुळे या राशीच्या लोकांचे भाग्य बदलेल. 3 राशीच्या लोकांसाठी हा शुभ काळ असेल. शनीच्या या बदलामुळे या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल.
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा 3 राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा
रविवार, 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 04:49 वाजता शनीचे नक्षत्र परिवर्तन होईल. सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी नक्षत्र परिवर्तन होईल. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा 3 राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होईल. 15 ऑक्टोबर 2023 रोजी शनि धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल.
मेष
मेष राशीच्या लोकांना शनीच्या राशीत बदलामुळे मोठा फायदा होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना नक्कीच प्रमोशन मिळेल. आर्थिक लाभ आणि उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. या काळात तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही कामात गुंतवले तर तुम्हाला नक्कीच आर्थिक लाभ मिळू शकतो.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना शनीच्या राशीत बदलामुळे भाग्याची साथ मिळणार आहे. तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता आणि नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. धार्मिक कार्यात जास्त लक्ष द्याल. तुम्ही कशातही गुंतवणूक करू शकता.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचा राशी बदल शुभ ठरणार आहे. या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळणार आहे. तुमचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहील. तुमची सर्व कामे होतील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Surya Grahan 2023 : आज वर्षातील दुसरे सूर्यग्रहण होणार, कोणत्या राशीवर होणार परिणाम? भारतात दिसणार का? जाणून घ्या