Shani 2024 : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला (Shani Dev) महत्त्वाचं स्थान आहे. शनि अत्यंत धीम्या गतीने आपली चाल बदलतो. शनि (Shani) जर शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचे भाग्य खुलतं. शनीचा शुभ प्रभाव असलेला व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करू शकतो, हेच दुसरीकडे शनीची वाईट दृष्टी व्यक्तीला कंगाल करुन सोडते. शनि सध्या कुंभ राशीत भ्रमण करत आहेत. शनि 6 एप्रिल रोजी दुपारी 03.55 वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात (Purva Bhadrapad Nakshatra) प्रवेश करेल. शनीच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींवर होईल.


वैदिक पंचांगानुसार, शनि ऑक्टोबरमध्ये (October) आपलं पुढील नक्षत्र बदलेल. अशा स्थितीत शनीची बदलती चाल काही राशींना जबरदस्त लाभ देऊ शकते. शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे 3 राशीच्या लोकांचं भाग्य उजळू शकतं, या काळात करिअर आणि बिझनेसमध्ये प्रगतीच्या अफाट शक्यता आहेत. शनीच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळतील? जाणून घेऊया.


शनि नक्षत्र परिवर्तनाचा या राशींना होणार लाभ


कन्या रास (Virgo)


शनीच्या नक्षत्रात होणारा बदल या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. यावेळी या राशीच्या व्यक्तीला कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. मालमत्तेतील कोणतीही जुनी गुंतवणूक तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करेल. नोकरदारांनाही कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील, कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्येही वाढ होईल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. 


वृश्चिक रास (Scorpio)


शनिदेवाच्या नक्षत्रात होणारा बदल वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी अनुकूल ठरेल. वर्षांपासून रखडलेल्या तुमच्या कामाला या काळात गती मिळेल. संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. या राशीच्या लोकांना सर्व भौतिक सुखं मिळतील. यासोबतच करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर हा काळ व्यावसायिकांसाठी खूप शुभ मानला जातो. यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता, तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. सुखी वैवाहिक जीवनामुळे मन प्रसन्न राहील. आईच्या आरोग्याशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते, आईसोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण शुभ मानलं जातं, कारण शनिदेव तुमच्या राशीच्या चढत्या घरात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीत पगारवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते. यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. वैवाहिक जीवन छान राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल, पैशांचा पाऊस पडू शकतो. कुटुंब आणि पूर्वजांकडून तुम्हाला आशीर्वाद मिळेल. शनीच्या कृपेने समाजात तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. पैशाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होऊ लागतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Aries April Horoscope 2024 : मेष राशीचा एप्रिल महिना खर्चिक; नोकरी-व्यवसाय कसा राहणार? मासिक राशीभविष्य जाणून घ्या