Shani Nakshatra Parivartan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता म्हणतात. शनि ज्या राशीत नक्षत्र परिवर्तन करतात त्या परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो. सध्या 3 ऑक्टोबर 2025 रोजी शनी महाराज पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्राचा स्वामी गुरु ग्रह बृहस्पती आहे. त्यामुळे शनी देव आणि गुरु ग्रहाची ऊर्जा मिळून अनेक राशींवर (Zodiac Signs) फार गंभीर परिणाम होणार आहे. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाने अनेक राशींच्या जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. तर, काही राशींना या काळात सतर्क राहण्याची गरज आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

'या' राशींना सावधानतेचा इशारा

शनीचं पूर्वाभाद्रपद नक्षत्रात होणार संक्रमण मेष, कन्या आणि मीन राशींच्या लोकांच्या अनेक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना या काळात सावधान राहण्याची गरज आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाच्या काळात सावधान राहण्याची गरज आहे. या राशीच्या बाराव्या चरणात शनीचं संक्रमण होणार आहे. यामुळे तुमचा मानसिक तणाव वाढू शकतो. तसेच, आरोग्याचीही काळजी घ्या. विशेषत: डोळे आणि पायांशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या बाबतीत तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच, आर्थिक बाबतीत तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांवर देखील शनीच्या नक्षत्राचा परिणाम दिसून येणार आहे. या राशीच्या वैवाहिक जीवनात तसेच, व्यवहारात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरम्यान पार्टनरशी संवाद साधताना सावधानता बाळगा. छोट्या-छोट्या कारणावरुन खटके उडू शकतात. तसेच, तुमच्या व्यवसायातही नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्या विवाहात अडथळे येण्याची शक्यता आहे. तसेच, या दरम्यान तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांवर आधीपासूनच शनीची साडेसाती सुरु आहे. त्यामुळे हे नक्षत्र परिवर्तन मीन राशीच्या अडचणी अनेक वाढवण्याची शक्यता आहे. या काळात पैशांशी संबंधित व्यवहारात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लालचे अभावी या काळात पैशांची गुंतवणूक करु नका. तसेच, पैसे कोणाला उधारी देऊ नका. निर्णय घेताना कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. तसेच, कामाच्या ठिकाणी संयम बाळगण्याची गरज आहे. कठीण काळात शांत राहण्याची गरज आहे. 

हेही वाचा :           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology : आज धन योगासह जुळून आला शुभ योगांचा संयोग; ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी 5 राशींना मिळणार धनलाभ, देवी लक्ष्मीची कृपा