Astrology Panchang Yog 1 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 1 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. आजपासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने मकर राशीत प्रवेश केला आहे. आजच्या शुभ योगानुसार (Yog) आज धन योग निर्माण झाला आहे. तसेच, उत्तराषाडा नक्षत्रात रवियोगाचा संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. 

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा चांगली तयार होईल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असणार आहे. नवीन गोष्टी शिकाल. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट होईल. तसेच, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येईल. त्यामुळे तुम्ही फार प्रसन्न असाल. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असणार आहे. तसेच, अनेक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुम्हाला  लवकरच परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ कायम तुमच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे तुम्ही एकत्र व्यवसाय देखील सुरु करु शकता. कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण असेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली असेल. तसेच, मित्रांची साथ तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग फार मोलाचा ठरणार आहे. कामाच्या नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर पडू शकतात. त्या प्रामाणिकपणे पार पाडाल. अतिरिक्त गोष्टींचा जास्त ताण घेऊ नका. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, भविष्यात तुम्हाला तुम्ही केलेल्या शुभ कार्याचा चांगला लाभ मिळेल. तुमचा स्वभाव सकारात्मक असेल. त्यामुळे प्रत्येक कार्यात तुम्ही प्रसन्न राहाल. 

हेही वाचा :           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

October 2025 Lucky Zodiac Signs: ऑक्टोबरचा संपूर्ण महिना 'या' 5 राशींचं नशीब पॉवरफुल्ल! मोठ्या ग्रहांचे संक्रमण, दत्तगुरूंची कृपेने कामात यश, पैसा ठरलेलाच...