Shani 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार 6 एप्रिलला पूर्वभाद्रपद नक्षत्रमध्ये शनिचा (Shani Dev) गोचर राशीत प्रवेश होणार आहे. शनीचा प्रभाव काही राशींवर पडणार आहे. 6 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तर, याआधी शनि 24 नोव्हेंबरपासून शतभिषा नक्षत्रमध्ये गोचर केलं होतं. शनिचा हा गोचर काही राशींसाठी लाभदायी असणार आहे. ज्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


शनिचं हे ग्रहांचं संक्रमण मेष राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या दरम्यान या राशीला धनलाभ होणार आहे.तर, जे लोक कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करत होते त्यांच्या समस्या दूर होतील. या दरम्यान तुम्हाला इतका धनलाभ होईल की यातून कदाचित तुम्ही नवीन प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकता. जे व्यवहार करतायत त्यांना चांगली डील मिळू शकते. तर, जे सरकारी नोकरी करतायत त्यांना या महिन्यात चांगली बातमी मिळू शकते. तुमची सगळी थांबलेली कामेही पूर्ण होतील. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीसाठी शनिवारी ग्रहांचं होणार संक्रमण लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगलं यश मिळेल. जर तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रमोशनला घेऊन चिंतेत आहात तर आता चिंता करण्याची गरज नाही. तुमचं प्रमोशन तर होणारच आहे पण तुमच्या पोस्टबरोबर तुमचा पगारही वाढणार आहे. करिअरमधील प्रगतीबरोबरच तुमची लव्ह लाईफ देखील चांगली जाणार आहे. ज्यांच्या लग्नात अनेक दिवसांपासून अडथळे येतायत त्यांच्या देखील सर्व समस्या दूर होतील. या दरम्यान तुम्हाला लग्नासाठी स्थळं देखील येऊ शकतात. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीला गेल्या अनेक दिवसांपासून ज्या समस्या जाणवत होत्य त्या लवकरच दूर होतील. या दरम्यान चुकूनही कोणाकडून कर्ज घेऊ नका. या काळात तुमच्या सुख आणि समाधानात भर पडणार आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन मार्ग मोकळे होतील. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमे संबंध अधिक घट्ट होतील. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळेल. तर, ज्या लोकांनी नवा व्यवसाय सुरु केला आहे त्यांच्या कामात चांगलं यश मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं बॉण्डिंग चांगलं राहील. या दरम्यान तुम्हाला चांगली बातमीही मिळू शकते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Horoscope 3rd April: बुधवारी 'या' राशीचे नशीब पालटणार, मिळणार फायदेशीर संधी; वाचा तुमचे राशीभविष्य!