Shani Margi 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, काल म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी कर्मफळदाता शनीने (Lord Shani) संध्याकाळी ठीक 7 वाजून 51 मिनिटांनी कुंभ राशीत मार्गीक्रमण केले. या राशीत शनी (Shani Dev) 29 मार्च 2025 पर्यंत असणार आहे. त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा प्रकारे तब्बल 134 दिवस शनी सरळ चाल चालणार आहेत. या कालावधीत शनी 3 राशींना त्यांच्या कर्माचं फळ देणार आहे. त्यामुळे या राशींनी सावध राहण्याची गरज आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
13 जुलै 2025 रोजी रविवारी सकाळी 9 वाजून 36 मिनिटांनी शनीची उलटी चाल सुरु करणार आहे. अशा प्रकारे 240 दिवस मार्गी राहून शनी वक्री चाल चालणार आहे. याचा कोणत्या राशींवर (Zodiac Signs) कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीच्या मार्गीचा प्रभाव कर्क राशीवर फार शुभ नसणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या उद्भवतील. तसेच, ऑफिसच्या ठिकाणी तुमच्यावर अनेकांचं लक्ष असेल. अनेकजण तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला मात्र या सगळ्यांवर मात करावी लागेल. विद्यार्थ्यांना देखील परीक्षेच्या काळात सावध राहण्याची गरज आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
शनीच्या मार्गीचा प्रभाव सिंह राशीच्या लोकांसाठी काहीसा सामान्य असणार आहे. या काळात ज्या तरुणांचे विवाह झालेले नाहीत अशा लोकांना थोडा संघर्ष करावा लागेल. या काळात तुम्ही व्यवसाय करताना थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.अन्यथा तुमच्या व्यवसायात तुम्हाला तोटा सहन करावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला मानसिक ताण सहन करावा लागेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीची मार्गी फार सामान्य ठरणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या आरोग्याप्रती अनेक तक्रारी तुमचे आई-वडील करु शकतात. कोर्ट-कचेरीच्या संदर्भात देखील कार्य सुरुच राहील. या कालावधीत कोणतीच महत्त्वाची जोखीम घेऊ नका. तसेच, कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: