Shani Jayanti 2024 Upay : आज शनि जयंती. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. शनि व्यक्तीला कर्माच्या आधारे फळ देतो, म्हणून शनीला (Shani) न्याय देवता म्हटलं जातं. कुंडलीतील शनीच्या स्थितीचा परिणाम हा व्यक्तीच्या जीवनावर नेहमी होत असतो. यंदा 8 मे रोजी शनि जयंती (Shani Jayanti 2024) आली आहे. हा दिवस शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी खास आहे.
आपल्यावर सतत येणारी संकटं कमी करण्यासाठी, तसेच साडेसाती दूर करण्यासाठी या दिवशी शनिदेवाची विधीवत पूजा केली जाते. तसेच, शनीची पिडा दूर करण्यासाठी शनि जयंतीच्या दिवशी काही खास उपाय (Shani Jayanti 2024 Remedies) केले जातात.
शनि जयंतीच्या दिवशी करा हे उपाय (Shani Jayanti 2024 Upay)
तिळाच्या तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचे दिवे लावा
शनि जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली 5 तिळाच्या तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचे दिवे लावावेत आणि हात जोडून सात परिक्रमा कराव्या.
हनुमान मंदिरातही दिवे लावा
शनीच्या साडेसातीने प्रभावित झालेल्या व्यक्तींनी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं पठण करावं. असं केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनात चालू असलेल्या समस्यांपासून आराम मिळतो, सर्व समस्या दूर होतात.
या उपायाने मिळेल शनिदोषापासून मुक्ती
शनि जयंतीच्या दिवशी संध्याकाळी एक नारळ घेऊन ते सात वेळा स्वतःवरुन फिरवा आणि मग तो वाहत्या पाण्यात सोडा. यासोबतच काळी उडीद बारीक करून पिठाचे गोळे बनवून संध्याकाळी माशांना खायला द्या, असं केल्याने शनीची पिडा दूर होते. हळूहळू सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.
सौभाग्य वाढीसाठी हे उपाय उपयुक्त
सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तसेच शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करा. यानंतर शनि स्तोत्र आणि शनि चालीसा पठण करा आणि गरीब आणि गरजू लोकांना काहीतरी दान करा. असं केल्याने शनिदेवाची कृपा राहील आणि कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होईल.
सावली दान करा
जर तुम्हाला शनि जयंतीला सकाळी सावली दान करता येत नसेल तर संध्याकाळीही करू शकता. यासाठी पितळेच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात एक नाणं टाका. त्यानंतर त्यात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ते तेल वाटीसोबत शनि मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला द्या. असं केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील आणि शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल.
काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला
जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनि जयंतीच्या संध्याकाळी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलातील चपाती किंवा भाकरी खाऊ घाला. असं केल्याने शनिदोष दूर होतो आणि जर तुमच्या जीवनात कोणतंही मोठं संकट येणार असेल तर तेही दूर होतं. काळ्या कुत्र्याला भाकरी दिल्याने शनि आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :