Shani Jayanti 2024 : हिंदू धर्मात शनिदेवाच्या (Shani Dev) पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रात शनि हा क्रूर आणि न्यायाचा ग्रह मानला जातो, तो कर्माच्या आधारे फळ देतो. शनिवारी शनिदेवाची उपासना करणं फलदायी मानलं जातं, परंतु शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची उपासना केल्यास व्यक्तीला इच्छित फळ मिळतं. लवकरच वैशाख महिना सुरू होत आहे आणि तेव्हा शनीची जयंती (Shani Jayanti 2024) असणार आहे.


शनिदेवाचा जन्म अमावस्येला झाला. शनि जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. एक चैत्र अमावस्या आणि दुसरी वैशाख अमावस्येला. यंदाच्या वर्षी शनि जयंती (Shani Jayanti 2024) कधी? योग्य तारीख, पूजा मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.


चैत्र शनि जयंती 2024 तारीख (Chaitra Shani Jayanti 2024)


शनि जयंती 8 मे रोजी, म्हणजेच बुधवारी चैत्र अमावस्येला साजरी केली जाईल. दक्षिण भारतात शनि जयंती चैत्रअमावस्येला साजरी केली जाते. शनिदेवाच्या कृपेने आर्थिक, मानसिक आणि शारीरिक लाभ होतात.


चैत्र शनि जयंती 2024 मुहूर्त (Chaitra Shani Jayanti Muhurta)


चैत्र अमावस्या तिथीची सुरुवात - 7 मे 2024, सकाळी 11.40 वाजता
चैत्र अमावस्या तिथी समाप्ती - 8 मे 2024, सकाळी 08.51 वाजता
शनि पूजेची वेळ - 8 मे रोजी संध्याकाळी 05.20 ते 07.01 वाजेपर्यंत (शनिदेवाची पूजा सूर्यास्तानंतर केली जाते)


वैशाख शनि जयंती 2024 तारीख (Vaishakh Shani Jayanti 2024)


ही शनि जयंती 6 जून 2024 रोजी, म्हणजेच गुरुवारी वैशाख अमावस्येला साजरी केली जाईल. उत्तर भारतात शनि जयंती वैशाख अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी वट सावित्री व्रत देखील पाळलं जातं.


वैशाख शनि जयंती 2024 मुहूर्त (Vaishakh Shani Jayanti Muhurta)


वैशाख अमावस्या तिथीची सुरुवात - 5 जून 2024, संध्याकाळी 07.54 वाजता
वैशाख अमावस्या तिथी समाप्ती - 6 जून 2024, संध्याकाळी 06.07 वाजता
शनि पूजेची वेळ - संध्याकाळी 05.33 ते 08.33 वाजता


शनि जयंतीचे महत्त्व (Shani Jayanti Significance)


शनिदेव चांगल्या आणि वाईट कर्मांचे फळ देतात. व्यक्तीच्या जीवनात शनिदेवाचा प्रभाव खूप प्रगल्भ जाणवतो. शनीच्या शुभ परिणामामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती होते. मालमत्ता लाभ, आर्थिक लाभ आणि राजकारणात मोठं पद मिळतं. शनि जयंतीला शनिदेवाची पूजा केल्याने कुंडलीतील शनि साडेसाती आणि धैयाचा अशुभ प्रभाव कमी होतो.


शनि जयंती पूजा विधी (Shani Jayanti Puja Vidhi)


शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला तिळाचं तेल अर्पण करावं. यासोबत काळे वस्त्रही अर्पण करावे. शमीच्या झाडाची पानं आणि अपराजिताची निळी फुलं यांचा विशेषत: पूजेत समावेश करावा.


शनि जयंती उपाय (Shani Jayanti Remedies)


तीळ, उडीद, काळी घोंगडी, बदाम, लोखंड, कोळसा इत्यादी गोष्टींच्या दानामुळे शनि प्रभावित होतो. शनि जयंतीला गरजू लोकांना धान्य, पैसे, कपडे, शूज, चप्पल, छत्र्या दान (Shani Jayanti Remedies) करा. तुम्ही पाणपोईचे मडके देखील दान करू शकता, यामुळे शनिदेव प्रसन्न होतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Dev : पुढचे 137 दिवस शनि चालणार उलटी चाल; 'या' 3 राशी कमावणार बक्कळ पैसा, चौफेर लाभाच्या संधी