Weekly Horoscope 22 To 28 December 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर (December 2025) हा आता अंतिम टप्प्यावर आला आहे. याचं कारण म्हणजेच आजपासून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. हा आठवडा अनेक राशींचं नशीब पालटणारा ठरणार आहे. तसेच, या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे. डिसेंबरचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी आजपासून सुरु झालेला आठवडा काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. तुमच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेमुळे तुमच्या गरजा देखील वाढतील. यासाठीच या आठवड्याच्या सुरुवातीलाच खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झाल्याच महिन्याच्या शेवटी तुम्हाला काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. अन्यथा तुमचा व्यवसाय उभारणार नाही. जे तरुण होतकरु सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांचे प्रयत्न या आठवड्यात सफल होणार नाहीत. महत्त्वाच्या कामांची जोखीम आत्ताच हातात घेऊ नका.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा मिश्रित फलदायी असणार आहे. या आठवड्याकडून तुमच्या जास्त काही अपेक्षा नसतील. त्याचप्रमाणे, कामाच्या बाबतीतही काहीशी आव्हानं समोर असतील. मात्र, त्यांचा हळुहळू का होईना सामना कराल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. आठवड्याच्या शेवटी अनेक मानसिक समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल. अशा वेळी कोणत्याही गोष्टीचा मानसिक ताण घेऊ नका. एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर नाराज होऊ नका.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी आजपासून सुरु झालेला आठवडा धावपळीचा असणार आहे. या आठवड्यात काही कारणास्तव तुमचे अपेक्षेपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतात. तसेच, करिअरच्या बाबतीतही तुमचा जास्त फोकस नसेल. व्यवसायात किंचित प्रगती दिसेल. पण, प्रयत्न आणि चिकाटीत सातत्य असेल तर तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. मुलांच्या आरोग्याबाबत चिंता करु नका. व्हायरल फिव्हरचा शिकार ते होऊ शकतात. मात्र, टेन्शन घेण्याची गरज नाही.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी आजपासून सुरु झालेला आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती दिसून येणार आहे. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला न्याय मिळेल. हातात घेतलेली कामे तुम्ही वेळेत पूर्ण कराल. तुमच्या कामाच्या बाबतीत प्रगती दिसेल. अनेकांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. घरात आनंदाचं वातावरण दिसेल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुम्ही ज्या ज्या गोष्टींचा विचार कराल त्या त्या गोष्टी घडतील. फक्त तुमचे प्रयत्न आणि चिकाटी गरजेची आहे. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. महत्त्वाची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, महत्त्वाच्या कामांना तुम्ही प्रोत्साहन द्याल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. फक्त बाहेरचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाणं टाळा. रोज पुरेशी झोप घ्या. नियमित व्यायाम करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :