Winter Travel: सध्या डिसेंबर महिना सुरूय. त्यामुळे हा थंडीचा महिना आहे. या महिन्यात अनेकजण फिरण्याचा प्लॅन करतात, कारण हा महिना फिरण्यासाठी उत्तम मानला जातो. जे लोक मुंबई-पुण्यात राहतात, ते विकेंडला बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. पण तुम्हाला माहित आहे का? मुंबईत अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत. मुंबईचे सौंदर्य पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक तेथे येतात. याच मायानगरीत म्हणजेच मुंबईत समुद्र आणि फिल्मस्टार्सचे बंगले तर आहेतच, याशिवाय अनेक ऐतिहासिक किल्ले सुद्धा आहेत. जे फार कमी लोकांना माहित आहेत.
दिल्ली-जयपूरप्रमाणेच मुंबईतही अनेक किल्ले
मुंबई, स्वप्नांची नगरी, खूप सुंदर शहर आहे. मुंबईत अनेक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय अनेक मोठ्या सिनेतारकांची घरे पाहण्यासाठीही लोक येथे येतात. पण सिनेतारकांनी भरलेल्या या शहरात अशी काही ठिकाणे आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. दिल्ली-जयपूरप्रमाणेच मुंबईतही अनेक किल्ले आहेत, ज्यांना भेट देणे एक वेगळा अनुभव ठरेल. पण लोक मुंबईत जाऊनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि समुद्राचा आनंद घेतात. मुंबईत समुद्र आणि शाहरुख खानचे घर मन्नत याबरोबरच तिथले अनेक ऐतिहासिक किल्लेही पाहण्यासारखे आहेत. जर तुम्ही मुंबईत राहत असाल किंवा तिथे जाण्याचा विचार करत असाल तर हे किल्ले सुद्धा नक्कीच पाहा.
कॅस्टेला डी अगुआडा (वांद्रे किल्ला)
मुंबईत Castella de Aguada ला वांद्रेचा किल्ला असेही म्हणतात. मुंबईतील पॉश भाग म्हणून वांद्रे समजला जातो. या शहरावर एकेकाळी पोर्तुगीजांचे राज्य असताना हा किल्ला बांधण्यात आला होता. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 24 मीटर उंचीवर आहे. माहितीनुसार, हा किल्ला शूटिंग स्पॉट देखील आहे. 'दिल चाहता है' सारख्या चित्रपटांचे चित्रीकरण याच किल्ल्यावर झाले आहे.
वरळीचा किल्ला
हा किल्ला मुंबईचे ऐतिहासिक ठिकाण आहे. पण फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. हा किल्ला इंग्रजांनी टेकडीच्या माथ्यावर बांधला, जेणेकरून शत्रूच्या जहाजांवर आणि समुद्री चोरांवर नजर ठेवण्यासाठी बांधला होता. माहितीनुसार, हा किल्ला संपूर्ण आठवडाभर खुला असतो, ज्याला तुम्ही पहाटे 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत भेट देऊ शकता.
एरमित्री किल्ला
हा किल्ला डोंगरी किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला मराठा राजवटीत बांधला गेला. या किल्ल्याभोवती सर्वत्र दृश्ये आहेत जी तुम्हाला 360 डिग्रीचे दृश्य दाखवतात. हा किल्ला समुद्रकिनारी वसलेला असून, उत्तरेला वसईचा किल्ला, पूर्वेला बोरिवली राष्ट्रीय उद्यान, दक्षिणेला एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडम आहे. इथे गेलात तर एकाच वेळी खूप काही बघायला मिळेल.
क्रॉस बेट किल्ला
हा किल्ला मुंबईच्या बंदरात आहे. येथे तुम्हाला ऐतिहासिक अवशेष म्हणून तेल रिफायनरी, मोठ्या गॅस टाक्या सापडतील. येथे जाण्यासाठी तुम्ही स्पीड बोट वापरू शकता.
बेसिन फोर्ट (वसई किल्ला)
मुंबईजवळच काही अंतरावर असलेला बेसिन किल्ला वसई येथे आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला असून सुमारे 110 एकरांवर पसरलेला आहे. हा किल्ला इतका मोठा आहे की त्यात 6 चर्च, तीन कॉन्व्हेंटसह अनेक इमारती होत्या. पण आता हा किल्ला भग्नावस्थेत असला तरी तो पाहण्यासारखा आहे.
हेही वाचा>>>
Maharashtra Hidden Places: 'अरेच्चा..! महाराष्ट्रात लपलेले 'हे' सुंदर हिल स्टेशन माहितच नव्हते!' अनेकांच्या नजरेपासून दूर, एकदा बघाल तर प्रेमातच पडाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )