Astrology Panchang 06 December 2024 : आज 6 डिसेंबर शुक्रवारचा दिवस आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. या तिथीला विवाह पंचमीच्या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग (Yog) आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशीच्या लोकांना होणार आहे. या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुम्हाला मित्र-परिवाराचं चांगलं योगदान लाभेल. तसेच, तुमच्या कुटुंबात लवकरच मंगलमय कार्य होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त असाल. तसेच, ग्रहांची स्थिती पाहता आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. त्यामुळे तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता.  


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असमार आहे. तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. तुमच्या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. त्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या आजूबाजूचं वातावरण फार प्रसन्न असणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील प्रसन्न वाटेल. आज तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. विद्यार्थ्यांना आज नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. भावा-बहि‍णींबरोबर तुमचा चांगला व्यवहार असेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. तसेच, आज तुम्हाला दिवसभरात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. तुमच्या मेहनतीचं फळ लवकरच तुम्हाला मिळेल. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुमच्यात निर्णय घेण्याची क्षमता चांगली दिसून येईल. तसेच, ज्या कामाची तुम्ही इतके दिवस वाट बघत होतात ते काम तुमच्याकडे समोरुन येईल. त्यामुळे तुम्ही निश्चिंक असा. तसेच, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. सामाजिक कार्यात तुमचं चांगलं योगदान असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Horoscope Today 06 December 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य