Shani Rashi Parivartan in Meen : ज्योतिषशास्त्रात शनीचा (Shani) स्वभाव सर्वात क्रूर मानला जातो. पण जर तुमच्यावर शनि प्रसन्न असेल तर गरीब माणसालाही राजा बनवण्याची ताकद त्याच्यात असते. शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. अशा स्थितीत प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. शनीचा पायगुण व्यक्तीला शुभ-अशुभ फल देतो.


शनि 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांच्या कुंडलीत शनि सोनपावलांनी प्रवेश करेल.  ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या जन्म राशीतून शनि दुसऱ्या, 5व्या आणि 9व्या घरात असेल तर तो शुभ पायगुण ठरतो. अशात, शनीने 2025 मध्ये मीन राशीत प्रवेश केल्यामुळे 3 राशींना मोठा फायदा होईल आणि शनि 2027 पर्यंत या राशीत राहील. त्यामुळे 2027 पर्यंत या राशी सुखात जीवन जगतील, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


कुंभ रास (Aquarius)


या राशीत शनि दुसऱ्या घरात असेल. अशा स्थितीत कुंभ राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. 2025 मध्ये तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरदार लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. यासोबतच तुम्हाला 2027 पर्यंत नोकरीत चांगले फायदे मिळतील. मोठा नफा होऊ शकतो. यासोबतच पदोन्नतीसोबत पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. सरकारी कामात सुरू असलेल्या अडचणी आता संपणार आहेत. यासोबतच अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील, यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद पसरेल.


कर्क रास (Cancer)


शनीने मीन राशीत प्रवेश केल्यावर तो मीन राशीच्या नवव्या घरात असणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती लाभदायक ठरू शकते. नोकरदारांना पगारवाढीसह पदोन्नती मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. प्रत्येक कामात कोणत्या ना कोणत्या मार्गाने येणारे अडथळे आता दूर होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात शनि नवव्या भावात असल्याशिवाय राहू आठव्या भावात असेल. शनि आणि राहूच्या स्थितीमुळे या राशीच्या लोकांना डबल फायदा होईल. तुमच्या मेहनतीचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल.


वृश्चिक रास (Scorpio)


मीन राशीत आल्यावर शनि या राशीच्या पाचव्या घरात असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी शनीचं राशी परिवर्तन खूप फायदेशीर ठरू शकतं. या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल. तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. तुम्ही आत्मपरीक्षण कराल, ज्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये बरेच चांगले बदल कराल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. या काळात तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या कामाचं, कष्टाचं आणि समर्पणाचं फळ मिळू शकतं. तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पगार वाढीचीही शक्यता आहे. परदेश प्रवासाच्या मार्गात येणारा अडथळा आता संपुष्टात येईल. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Budh Gochar 2024 : डिसेंबरपर्यंत 3 राशी जगणार राजासारखं जीवन; कुबेराच्या कृपेने लाभणार सुख-संपत्ती, बँक बॅलन्समध्ये होणार अफाट वाढ