Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. कर्मफळदाता शनीचं (Shani Dev) आपल्या सर्वांच्याच राशीत महत्त्वाचं योगदान आहे. न्यायदेवता असलेला शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. तसेच, व्यक्तीला योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि जे वाईट मार्गाला गेले आहेत त्यांना सतर्क करण्यासाठी शनी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच शनीच्या संक्रमणाने प्रत्येक राशीतील लोक घाबरतात. यावर्षी शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. याचा कोणत्या राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनीच्या संक्रमणाच्या वेळी एकादश चरणात प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे संक्रमण अनेक अर्थाने लाभदायक ठरेल. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीचं हे संक्रमण मिथुन राशीत होणार आहे.त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. शनीच्या कृपेने तुमची सर्व कामे अगदी निर्विघ्नपणे पार पडतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुम्हाला ढैय्यापासून मुक्ती मिळेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचे आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुमचं चांगलं व्यक्तिमत्व लोकांसमोर उभं राहील. तसेच, शेअर बाजारात तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार होईल. मित्रांच्या मदतीने तुमची अनेक कामे पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: