Shani Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. शनी (Lord Shani) प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. यामुळेच प्रत्येकाला जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. शनी हा सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह आहे. तो एका राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत असतो. तसेच, शनीला  एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास 30 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळेच, शनीचा अशुभ परिणाम राशींवर दिर्घकाळ टिकणारा असतो. 


शनी 3 ऑक्टोबर रोजी म्हणजेच उद्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याचा काही राशींच्या लोकांना चांगलाच लाभ मिळू शकतो. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. द्रिक पंचांगानुसार, शनी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनी 27 डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात स्थिर असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार,या नक्षत्राचा स्वामी राहू आणि राशी कुंभ आहे. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


शनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करुन तिसऱ्या चरणात असणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी हे राशी परिवर्तन फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभ होईल. तसेच, प्रगतीचे उंच शिख गाठण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. मित्रांच्या सहयोगाने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. या काळात वाईट विचार अजिबात करु नका. तसेच, तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. अन्यथा, लोक तुमच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


शनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करुन नवव्या चरणात असणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. तुम्हाला परिक्षेत चांगलं यश मिळेल. तसेच, तरुण वर्गातील लोकांना या काळात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Horoscope Today 02 October 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य