Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या (Shani) हालचालीचा प्रत्येक राशीच्या लोकांवर खोलवर परिणाम होत असतो. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपल्या राशीत बदल करत असतात, अशात शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षं राहतो. अशा प्रकारे शनिदेवाला 12 राशींचं चक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्ष लागतात. शनि ग्रह सध्‍या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत विराजमान आहे. पुढील 294 दिवस शनि कुंभ राशीतच राहणार आहे. 18 मार्चला शनीचा कुंभ राशीत उदय होईल. शनीच्या या स्थितीचा काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे, या काळात तुमची धन-संपत्ती वाढेल आणि अडीअडचणी दूर होतील. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


शनीची चाल पुढील 294 दिवस मेष राशींसाठी लाभदायक ठरू शकते. शनीच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीचे बरेच पर्याय या काळात तुमच्यासाठी उपलब्ध होतील. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला विचार करुन निर्णय घ्यावा लागेल.


सिंह रास (Leo)


पुढील 294 दिवस शनिदेवाचं कुंभ राशीत असणं सिंह राशीसाठी फलदायी ठरू शकतं. या काळात करिअरच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला भरघोस यश मिळेल. शनिदेवाच्या कृपेने कृपेने तुमच्या संपत्तीत वाढ होईल. तुमची रखडलेली प्रलंबित कामं पूर्ण होतील. तुमचं लव्ह लाईफ चांगलं राहील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीला शनिदेवाच्या कृपेने पुढील 294 दिवस चांगल्या बातम्या मिळतील. तुम्हाला या काळात जुन्या गुंतवणुकीतून मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. तुम्हाला अनपेक्षितपणे पैसे मिळू शकतात. या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये भरपूर वाढ होईल, तुमचे उत्पन्न प्रचंड वाढेल. संतती सुखाची इच्छा असणाऱ्यांना संतती सुख मिळण्याची शक्यता आहे. 


शनीची वाईट दृष्टी कोणावर?


या वर्षी शनीची साडेसाती आणि धय्येच्या परिणामामुळे 5 राशीच्या लोकांना जपून राहावं लागणार आहे. यात कर्क रास, वृश्चिक रास, मकर रास, कुंभ आणि मीन राशीचा समावेश आहे. या 5 राशींना एका वर्षाच्या काळात सांभाळून राहावं लागणार आहे, या काळात तुमचं बरंच नुकसान होऊ शकतं.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani 2024 : ऐन होळीच्या काळात होणार शनीचा उदय; लागणार चंद्रग्रहण, 'या' 3 राशी कमावणार बक्कळ पैसा