Shani Uday 2024 : यंदा 24 मार्चला होळी (Holi) आहे आणि 25 मार्चला धुलिवंदन (Dhulivandan) आहे. याच काळात शनि उदय स्थितीत असणार आहे आणि सोबतच 25 मार्चला चंद्रग्रहण देखील लागत आहे. त्यामुळे ग्रहांच्या स्थितीतील हालचाली पाहता यंदाची होळी काही राशीच्या लोकांसाठी फार शुभ ठरणार आहे. 18 मार्चला शनीचा (Shani) उदय होईल आणि वर्षभर तो त्याच स्थितीत राहील. धूलिवंदनाला लागत असलेल्या चंद्रग्रहणामुळे आणि शनीच्या उदय स्थितीमुळे 3 राशींच्या लोकांना चांगले दिवस येणार आहेत, या 3 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या


वृषभ रास (Taurus)


शनीची उदय स्थिती आणि चंद्रग्रहणाचा विशेष फायदा वृषभ राशीच्या लोकांना होईल. होळीच्या दिवसांत या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरीत अधिकारी आणि सहकाऱ्यांची मदत लाभेल. व्यावसायिकांना चांगले दिवस येतील, तुम्ही व्यवसायात चांगला नफा कमवाल, एखादा मोठा करार तुम्हाला या काळात मिळू शकतो. तुमच्या घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांना या काळात चांगली बातमी मिळू शकते. मित्रांच्या मदतीने सर्व अडचणी दूर होऊ लागतील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी होळीचा काळ शुभ ठरणार आहे. चंद्रग्रहणाची छाया आणि शनीची उदय स्थिती यामुळे तुम्हाला होळीच्या दिवशी अनेक शुभ परिणाम मिळतील. या राशीच्या लोकांची वर्षानुवर्षे रखडलेली कामं मार्गी लागतील. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचीही दाट शक्यता आहे. तुमच्या घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरीच पदोन्नती होण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी होळीचा काळ अनुकूल ठरेल. या दिवसांत तुम्ही भरघोस नफा कमवाल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांना होळीच्या दिवशी शनीची उदय स्थिती आणि चंद्रग्रहणाचा चांगला लाभ होऊ शकतो. होळीपासून तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू संपतील. नोकरीत तुमची प्रगती होईल. तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्ही सर्व कामं चांगल्या पद्धतीने पूर्ण कराल. या काळात तुम्ही परदेश प्रवासाही करू शकता. फक्त सगळं चांगलं करत असताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 'या' 10 गोष्टींचं पालन करणाऱ्यांना शनि कधीच देत नाही त्रास; वेळ आल्यावर देतो भरघोस सुख