Shani 2024 : नवग्रहांमध्ये शनि (Shani) हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनि माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. यासोबतच शनि हा एकमेव ग्रह आहे जो साडेसातीला कारणीभूत आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी शनीच्या प्रकोपाला सामोरा जातो. शनीच्या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. काहींना याचे अशुभ परिणाम सोसावे लागतात, तर काहींना शनि शुभ फळ देतो.


सध्या शनि पूर्वाभाद्रपद नक्षत्रात स्थित आहे. 3 ऑक्टोबर रोजी शनि नक्षत्र बदलून राहूच्या नक्षत्र शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. राहू हा पापी ग्रह मानला जातो, तर शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. पंचांगानुसार, शनि 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल आणि 27 डिसेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील. शनीने शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्याने काही राशींना फायदा होईल, तर काहींना सावध राहण्याची गरज आहे. या काळात कोणत्या राशींना अफाट लाभ होईल? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


शनीने शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्यावर या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप फायदा होणार आहे. व्यावसायिक जीवनात प्रचंड यश मिळवून तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता. या काळात परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. परदेशात फिरण्याचं तुमचं स्वप्न असेल तर ते नक्कीच पूर्ण होऊ शकतं. याशिवाय परदेशातूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना खूप फायदा होणार आहे. तुमचं आरोग्यही या काळात चांगलं राहील.


धनु रास (Sagittarius)


शनीच्या नक्षत्र बदलामुळे धनु राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल. करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला नवीन नोकरीच्या अनेक संधीही मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी दीर्घकाळ चाललेल्या समस्या आता सुटू शकतात. यासोबतच सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि तुमचा आदर वाढेल. व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला सरकारी योजनेचे फायदे मिळतील. तुमची लव्ह लाईफ सुद्धा चांगली जाणार आहे. घरात आनंदीआनंद राहील.


मेष रास (Aries)


शनी राहूच्या नक्षत्रात आल्याने मेष राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. जे काम पूर्ण करण्याची तुम्हाला खूप दिवसांपासून इच्छा होती ते आता नक्कीच पूर्ण होईल. या काळात कर्ज घेतलेले पैसे परत केले जाऊ शकतात. जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होईल. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही समाधानी दिसत असाल. बऱ्याच काळापासून जीवनात सुरू असलेल्या समस्या आता संपुष्टात येऊ शकतात. शनिदेव तुम्हाला प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यास मदत करतील. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. यासोबतच आरोग्यही चांगलं राहणार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Vakri 2024 : शनीची वक्री चाल 'या' 3 राशींवर बरसणार; प्रगतीच्या मार्गात येणार खड्डे, हातचा पैसा निघून जाणार