Shani Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Lord Shani) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. यामुळेच शनी (Shani Dev) ग्रहाच्या स्थितीत थोडासा जरी बदल झाला तरी त्याचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होतो. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला शनी मोठं परिवर्तन करणार आहे. म्हणजेच शनी राहूच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनीचं राहू नक्षत्रात आगमन अशुभ मानलं जातं. यामुळेच शनीच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केल्याने सर्वात जास्त कोणत्या राशींवर (Zodiac Signs) परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


शनी आणि राहूचा संयोग फार अशुभ मानला जातो. मात्र मेष राशीच्या लोकांना या संयोगाचा चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुमचा तणाव दूर होईल. तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फर लाभदायी ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. जर तुम्हाला नवीन काम सुरु करायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला यश मिळेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन सुख-संपत्ती आणि समृद्धी देणारं असेल. या काळात तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. तसेच, एकामाागून एक धनलाभाच्या संधी मिळतील. मित्रांच्या साहाय्याने तुमची अनेक कामे अगदी सहज पूर्ण होतील. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 


कन्या रास (Virgo Horoscope)


शतभिषा नक्षत्रात शनीचं संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी वैयक्तिक जीवनात फार सुखकारक असणार आहे. ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल त्यांच्यासाठी हा काळ फार चांगला आहे. तुमच्या आयुष्यात आनंद येईल. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी शनीचं शतभिषा नक्षत्रात संक्रमण सकारात्मक बदल घेऊन येणारं असेल. या काळात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ होईल. घरात सुख-शांती नांदेल. नोकरदार वर्गातील लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Numerology Of Mulank 4 : अत्यंत संशयी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; छोट्याशा गैरसमजुतीने सहज तोडतात नातेसंबंध