Numerology Of Mulank 4 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक मूल्यांकाचं (Mulank) विशेष असं महत्त्व आहे. प्रत्येक मूल्यांकानुसार व्यक्तीचं खास व्यक्तित्व असते. व्यक्तीचा मूलांक काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्या व्यक्तीची जन्म तिथी माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये मूलांक असणाऱ्या लोकांबद्दल महत्त्वाची माहिती सांगण्यात आली आहे. 


ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक 4 असतो. प्रत्येक ग्रहाचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. मूलांक 4 चा संबंध राहूशी जोडण्यात आला आहे. या लोकांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं असतं ते जाणून घेऊयात. 


रहस्यमय विषयांचे जाणकार असतात


मूलांक 4 असणाऱ्या लोकांवर राहूचा प्रभाव जास्त असल्यामुळे या लोकांची गूढ, रहस्यमयी विषयांत फार आवड असते. या लोकांना सर्व विषयाची माहिती असते. माहितीचा साठा जास्त असल्यामुळे हे लोक फार लवकर इतरांना आपल्याकडे आकर्षित करतात. मूलांक 4 असणारे लोक फार जिद्दी स्वभावाचे असतात. या लोकांवर सूर्याचा देखील प्रभाव असतो. यामुळेच हे लोक फार साहसी आणि कुशाग्र बुद्धीचे असतात. 


बिनधास्त आयुष्य जगतात


मूलांक 4 असणाऱ्या लोकांना बिनधास्त जीवन जगायला आवडते. या लोकांना चेष्टा करायला आवडते. या लोकांना कधीच कोणत्याच गोष्टीची चिंता भासत नाही. तसेच, फार लवकर यांचे मित्र बनतात. लोकांमध्ये राहणं यांना फार आवडतं. तसेच, या जन्मतारखेचे लोक वेळ आणि नियमांचे फारच पक्के असतात. तसेच, आपलं काम वेळेत हे लोक पूर्ण करतात. फिरण्याची यांना आवड असते. 


संशयी स्वभाव ठरतो घातक 


या जन्मतारखेच्या लोकांचं राहणीमान देखील रॉयल पद्धतीचं असतं. पण यांचा स्वभाव प्रचंड संशयी स्वभावाचा असतो. संशयी स्वभावामुळेच अनेकदा यांना अनेक गैरसमज होतात. तसेच, यांच्या संशयी स्वभावाचा नातेसंबंधांवरही वाईट परिणाम होतो. अनेकदा लोक या कारणामुळेच यांच्यापासून दुरावतात. शेवटी या जन्मतारखेच्या लोकांवर आपल्या स्वभावामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Graha Gochar 2024 : ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली! शनी, सूर्य, मंगळसह सर्वच ग्रहांचं राशी परिवर्तन; 12 राशींवर कसा होणार परिणाम?