Shani Dev : पंचागानुसार पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये शनिची राशी बदलणार आहे. 17 जानेवारी 2023 रोजी शनि मकर राशीतून कुंभ राशीत जाईल.  30 वर्षानंतर शनिदेव त्याच्या मूळ म्हणजे कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत.


ज्योतिषशास्त्रानुसार शनि दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो. अशा प्रकारे, त्याला त्याचे राशी चक्र पूर्ण करण्यासाठी 30 वर्षे लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनि हा क्रूर ग्रह मानला जातो. त्यामुळे त्याच्या अवकृपेमुळे अनेकांना त्रास होतो. याबरोबरच शनीला कर्म आणि लाभाचे अधिकार दिले आहेत, राजकारण, तंत्र, तेल, खनिजे यांचा कारक असल्याचे सांगितले जाते. शनिदेवाच्या कृपेशिवाय कोणीही उच्च पदावर विराजमान होऊ शकत नाही.  


ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, शनिदेव जवळपास 30 वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनीचा कुंभ राशीत प्रवेश होताच कुंभ, मकर, मीन, कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीची साडेसती सुरू होईल. 
 
कुंभ राशित शनीच्या संक्रमणाने कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीची शय्या सुरू होईल. ज्याच्या प्रभावामुळे या राशींना पैसा आणि आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. साडेसातीमुळे पीडित राशीच्या लोकांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. घर, कुटुंबातील सुख-शांती भंग पावू शकते किंवा कमी होऊ शकते. या दोन्ही राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव आहे. त्यांना नोकरी आणि व्यवसायात नुकसान होऊ शकते. त्यांच्या नोकरीत अडचण येऊ शकते किंवा त्यांना नोकरी सोडावी लागू शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते किंवा नफा कमी होऊ शकतो. उत्पन्नात घट होऊ शकते. आरोग्यही खराब होऊ शकते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.


 दरम्यान, शनिच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांचे नुकसान होणार असले तरी काही राशीच्या लोकांचा फायदा देखील होणार आहे. शनिचे संक्रमण झाल्यानंतर  मेष, वृषभ, कन्या आणि धनु या राशीच्या लोकांचं भाग्य खुलणार आहे.  या राशीच्या लोकांचं प्रत्येक काम शुभ होणार असून संपत्तीत वाढ होणार आहे.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या


Shani Transit 2023 : 2023 मध्ये कुंभ राशीत शनिचे संक्रमण, या चार राशींचे भाग्य खुलणार