Shani Dhaiyya 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. यामुळे मेष, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे. 2026 मध्ये शनि पुन्हा मीन राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे दोन राशींच्या लोकांवर शनीच्या ढैय्याचा परिणाम कायम असणार आहे. 

Continues below advertisement

खरंतर, 2026 मध्ये शनिची ढैय्या सिंह आणि धनु राशींवर असणार आहे. शनिच्या ढैय्यामुळे 2 राशींच्या लोकांना नवीन वर्षात देखील अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. तसेच, पुढच्या वर्षात शनि वक्री, मार्गी आणि शनिचा उदय देखील होणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष काही राशींसाठी चढ-उतारांचं असणार आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

नवीन वर्षात शनिची ढैय्या सिंह राशीच्या लोकांवर पडणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना फार सावधान राहण्याची गरज आहे. हळुहळू तुमच्या कामात स्थिरता येईल. या काळात नोकरीत जबाबदारी वाढतील. तुमचं प्रमोशन रखडू शकतं. तसेच, तुमची रखडलेली कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत. आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. खर्चात अचानकपणे वाढ होऊ शकते. तसेच, आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल. शनिच्या ढैय्यामुळे तुम्हाला गैरसमजुतीचा सामना करावा लागेल. 

Continues below advertisement

धनु रास Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी शनिची ढैय्या चाल फार आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहणं कठीण जाईल. तसेच, तुमच्या कामात शिस्त दिसमार नाही. तुम्ही हातात घेतलेली कामे वेळेत पूर्ण होणार नाहीत. या काळात कोणताही निर्णय घेण्याच्या आधी तज्ज्ञांचं तसेच, कुटुंबातील सदस्यांचं मत विचारात घ्या. तुमच्या आर्थिक स्थितीत चढ-उतार दिसून येईल. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, सांधेदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. शनिच्या प्रभावाने तुम्हाला थकवा जाणवू शकतो. यासाठीच 2026 मध्ये आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. 

हे ही वाचा :                                                            

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shatank Yog 2025 : शनि-शुक्राचा 'शतांक योग' या राशींसाठी वरदानाचा; 13 डिसेंबरपासून एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, संपत्तीतही भरभराट