Shani Dev Shanti Upay : रावाचा रंक आणि रंकाचा राव करणारा ग्रह म्हणजे शनि. शनि (Shani) हा शिस्तीचा आणि न्यायाचा देव मानला जातो. अशात दंडाधिकारी शनिच्या कोपापासून वाचण्यासाठी शनिवारच्या दिवशी काही गोष्टी करणं अत्यंत महत्वाचं आहे. शनिदेवाची कृपा असेल तर एखादा भिकारी राजा बनू शकतो, हेच जर शनि देवाचा त्रास सुरू झाला तर एखाजा राजा व्यक्ती देखील भिकारी बनू शकतो, म्हणजेच त्याची आर्थिक खालावू शकते, साम्राज्य डबघईला येऊ शकतं.


ज्योतिष शास्त्रामध्ये शनीची साडेसाती आणि साडेसातीचा काळ अत्यंत क्लेशदायक मानला गेला आहे. अशात शनीच्या त्रासापासून दूर राहायचं असेल तर शनिवारच्या दिवशी काही उपाय केले पाहिजे.


या उपायांनी शनिवारच्या दिवशी शनिला करा प्रसन्न



  • जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर शनिवारी रात्री वाहत्या नदीच्या पाण्यात पाच लाल फुलं आणि पाच दिवे सोडा, यामुळे धनाशी संबंधित समस्या दूर होतील.

  • तुमचे वाईट दिवस सुरू असतील तर शनिवारी पाण्यात काळे तीळ टाकून ते शिवलिंगावर अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. यानंतर मंदिरात बसून शनि मंत्राचा जप करा आणि शनि चालीसा पठण करा. याचा खूप फायदा होईल.

  • ब्रह्म मुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि 'ओम शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करा. नंतर पिंपळाला स्पर्श करून नमस्कार करून सात परिक्रमा करा.

  • शनिवारी तेलात बनवलेले भिकाऱ्यांना खाऊ घातल्यास शनिदेव प्रसन्न होतात.

  • मोहरीच्या तेलात भाजलेला पराठा काळ्या कुत्र्याला खायला द्या किंवा चपातीमध्ये मोहरीचं तेल लावून काळ्या कुत्र्याला खायला द्या, यामुळे देखील शनिदेव प्रसन्न होतात.

  • शनिवारी नारळात साखर आणि पीठ भरावं, यानंतर मुंग्यांना ते खाऊ घालावं. असं केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात, असं मानलं जातं.

  • शनिवारी एका भांड्यात मोहरीचं तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पाहा आणि ते तेल कोणत्याही गरजूला दान करा, यामुळे शनिशी संबंधित त्रास दूर होतात.

  • दर शनिवारी सकाळी मारुती स्तोस्त्र आणि शनि मंत्रांचा जप करा, घरामध्ये शमीचं रोप लावा.

  • शनिवारी शनीची पूजा केल्यानंतर शनिशी संबंधित वस्तूंचं दान करा.

  • शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण करावं. गरजूंप्रती सेवेची भावना ठेवा आणि रुग्णांची सेवा करा, औषधं दान करा.

  • शनिचा कोप टाळायचा असल्यास सजीवांच्या भल्यासाठी प्रयत्न करा, त्यांना इजा पोहोचवू नका.

  • कोणावरही अन्याय करू नका, कारण अन्याय करणाऱ्याला शनिदेव कठोर शिक्षा देतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Uday : शनिदेव मार्च 2024 पासून पालटणार 'या' 3 राशींचं भाग्य; प्रत्येक दु:खातून करणार मुक्त