Shani Uday 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांमध्ये शनीला (Shani) विशेष स्थान आहे. असं म्हणतात की, ज्या व्यक्तीवर शनिदेवाची शुभ दृष्टी पडते त्याला जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही. कुंडलीत शनिदेवाची शुभ स्थिती असल्यास व्यक्ती आयुष्यात उंचीपर्यंत पोहोचू शकतो. ज्योतिषशास्त्रात शनिला न्याय आणि परिणाम देणारा देवता मानलं जातं. शनि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. प्रत्येक राशीसाठी शनीची स्थिती खूप महत्त्वाची असते.


शनि 2024 मध्ये कुंभ राशीत राहील आणि आपली हालचाल बदलेल. फेब्रुवारी 2024 मध्ये शनि मावळेल आणि नंतर 18 मार्च 2024 रोजी पुन्हा उगवत्या अवस्थेत येईल. शनिदेवाच्या स्थितीत बदल झाल्यामुळे तीन राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


18 मार्च 2024 मध्ये शनिदेवाचा उदय होईल आणि याचा वृषभ राशीच्या लोकांना फायदा होईल. शनिदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. नोकरीत काम करणाऱ्या लोकांची पदोन्नती होऊ शकते, यामुळे तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जोडीदारासोबत चांगला संवाद साधता येईल आणि प्रत्येक वळणावर जोडीदाराचं सहकार्य मिळेल. शनिच्या उदयामुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे.


तूळ रास (Libra)


ज्योतिषशास्त्रानुसार, शनिच्या उदयामुळे तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल होऊ शकतात. या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल. तुम्हाला जे आवश्यक असेल ते सर्व तुम्हाला मिळेल. नववर्षात तुमच्याकडे पैशाची आवक वाढेल, तुम्हाला कधी पैशाची कमी भासणार नाही. तुमचं आरोग्य चांगलं राहील.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची चिन्हं आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना परीक्षेत यश मिळू शकतं. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला 2024 मध्ये चांगली नोकरी मिळेल. कुटुंबात सुख-शांति नांदेल. वैवाहिक जीवन सुखी होईल. शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला सर्व बाजूंनी शुभवार्ता मिळू शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Diwali 2023 : आज शोभन योग आणि अनुराधा नक्षत्राचा शुभ संयोग; 'या' 4 राशींना ठरणार लाभदायक