Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Lord Shani) हा कर्मफळदाता आहे. शनीला (Shani Dev) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. शनीची चाल वक्री असो किंवा मार्गी याचा सर्व राशींवर परिणाम होतो. मागच्याच वर्षी शनीने कुंभ राशीत संक्रमण केलं होतं. पुढचे आणखी 244 दिवस शनी कुंभ राशीतच स्थित आहे. शनीच्या कुंभ राशीत संक्रमणाने शश राजयोग निर्माण झाला आहे. शनी या काळात वक्री चालसुद्धा चालणार आहे. शनीच्या वक्री चालीने कोणत्या राशींवर (Zodiac Signs) फरक पडणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
कुंभ राशीत शनी विराजमान असल्यामुळे तूळ राशीच्या लोकांना पुढचे 244 दिवस आनंदाची बातमी मिळणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. तुमच्या तब्येतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनासुद्धा या काळात चांगली बातमी मिळेल. तसेच, कुटुंबातील सदस्यांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
सिंह रास (Leo Horoscope)
पुढचे 244 दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक टास्क देण्यात येतील. ज्यामुळे तुमची चांगली वाढ होऊ शकते.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या वक्री चालीने पुढचे 244 दिवस मेष राशीच्या लोकांसाठी शुभकारक असणार आहे. शनीच्या शुभ प्रभावाने तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. गुंतवणुकीत तुम्हाला अनेक नवीन ऑप्शन्स मिळू शकतील.
शनीच्या साडेसातीचा कोणत्या राशीवर परिणाम होतो?
यावर्षी शनीची साडेसाती आणि ढैय्याच्या वाईट परिणामामुळे पाच राशीच्या लोकांना सांभाळून राहण्याची गरज आहे. या काळात कर्क रास, वृश्चिक रास, मकर रास, कुंभ रास आणि मीन राशीच्या लोकांवर प्रभाव पडू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :