Astrology 28 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज रविवार, 28 जुलै रोजी चंद्र मेष राशीत भ्रमण करेल. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी शुक्रादित्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात आज सुधारणा होईल. मालमत्तेशी संबंधित काही वाद सुरू असतील तर ते सोडवले जातील. आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आज या दिशेने पावलं टाकू शकता. जे लोक शिक्षण, नोकरी किंवा प्रवासासाठी परदेशात जाण्यास इच्छुक आहेत, त्यांचं स्वप्न आज पूर्ण होऊ शकतं. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं घट्ट होईल आणि तुम्ही प्रत्येक कामात एकमेकांना साथ द्याल. रविवारच्या सुट्टीमुळे तुम्ही घरात मुलांसोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. संध्याकाळी मित्रांसोबत कुठेतरी जाऊ शकता.

सिंह रास (Leo)

आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येईल. आज सूर्यदेवाच्या कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांच्या मानसन्मानात चांगली वाढ होईल आणि तुमचे अपूर्ण काम पूर्ण होण्याचे संकेतही मिळतील. व्यवसायात नफा होण्याची शक्यता असेल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील, ज्यामुळे व्यवसाय शिखरावर पोहोचेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्या लोकांना यश मिळेल. नशीब तुमच्या बाजूने राहिल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील, ज्यामुळे त्यांच्या यशाचा मार्ग मोकळा होईल. तुमच्या जोडीदाराशी संबंध चांगले राहतील आणि तुम्ही संध्याकाळी मुलांसोबत बाहेर जाऊ शकता.

Continues below advertisement

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आज सुधारेल आणि अनेक खास लोकांशी ओळखही वाढेल. जर तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला असेल. रविवारच्या सुट्टीमुळे संपूर्ण कुटुंब मजा करेल. नशिबाच्या पाठिंब्याने तुम्ही प्रत्येक काम पूर्ण करू शकाल आणि चांगले आर्थिक लाभही मिळतील. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात तुम्हाला चांगली प्रगती दिसेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करू शकता.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. धनु राशीचे लोक आज आपल्या हुशारीने सर्व शत्रूंचा पराभव करू शकतील. रविवारच्या सुट्टीमुळे आज व्यावसायिकांना नफ्याचे प्रमाण वाढवता येईल. जर तुम्हाला बँकेकडून कर्ज किंवा मालमत्ता खरेदी-विक्री करायची असेल तर आज यश मिळू शकेल. मुलाच्या विवाहाशी संबंधित कोणतीही समस्या आज संपेल, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही मित्रांसोबत मजा करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत कराल. लव्ह लाइफ आनंदी असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक डिनरवर जाण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नातं मजबूत होईल. 

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज वडिलोपार्जित मालमत्तेचा आणि पैशाच्या इतर अनपेक्षित स्त्रोतांचा फायदा होऊ शकतो आणि ते मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकतात. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील आणि शिक्षकांचंही सहकार्य मिळेल. तुमची प्रलंबित कामंही आज सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस शुभ असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 28 July 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य