Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची स्थिती नेमकी कोणती आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं मानलं जातं. शनी (Shani Dev) एका ठराविक अंतराने मार्गक्रमण करतात. शनीच्या उलट्या चालीचा किंवा सरळ चालीचा मनुष्यावर परिणाम होतो. सध्या शनी (Lord Shani) कुंभ राशीत विराजमान आहे. शनीने 30 जून 2024 रोजी कुंभ राशीतून वक्री चाल केली. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत शनी याच राशीत स्थित असणार आहे. हिंदू पंचांगानुसार, यावर्षी दिवाळीचा सण 3 नोव्हेंबरपासून सुरु होतोय. त्यामुळे या काळात शनीच्या वक्री चालीचा 5 राशींवर (Zodiac Signs) नेमका कसा परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तसेच, मेहनतीच्या जोरावर तुम्हाला पैसे कमावण्याची संधी मिळेल. जोडीदाराबरोबरचा हा काळ चांगला असेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फार चांगली ठरणार आहे. जे तुमचे अनेक दिवसांपासून काम रखडले होते ते या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या क्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळेल. प्रोफेशनल लाईफमध्ये उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. 


कन्या रास (Virgo Horoscope)


शनीच्या प्रभावाने तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. तसेच, या काळात प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास देखील या काळात वाढलेला दिसेल. व्यापारी वर्गासाठी ही फार चांगली संधी आहे. आर्थिक प्रगतीमुळे तुमचं मन अगदी प्रसन्न असणार आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


शनीची वक्री चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगली ठरणार आहे. 15 नोव्हेंबरचा काळ हा तुमच्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. धनलाभाचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये चांगली वाढ होईल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीत शनीची वक्री चाल फार शुभ ठरणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. तसेच, शनीच्या प्रभावाने तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक नवीन मार्ग खुले होतील. जर तुम्हाला पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा काळ चांगला आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Astrology News : आज ध्रुव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग, तूळसह 'या' 5 राशींना मिळणार लाभच लाभ