Shani Dev : ज्योतिष शास्त्रात शनिला (Shani Dev) न्याय देवता म्हटले जाते. कारण शनि प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शनिबद्दल भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शनि सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. अडीच वर्षांच्या कालावधीनंतर शनिचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन होतं. त्यामुळे शनिचा शुभ-अशुभ प्रभाव व्यक्तींवर जास्त काळ राहतो. 2023 मध्ये शनिने संक्रमण करून कुंभ राशीत प्रवेश केला होता. 2024 मध्ये देखील शनि आपली मूळ रास कुंभ राशीतच राहणार आहे. पण, 29 मार्च 2025 रोजी शनि संक्रमण करून सर्वात शेवटची रास म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. 


'या' राशींवर असेल शनिची साडेसाती 


सध्याच्या काळात मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनिची साडेसाती सुरु आहे. 2025 मध्ये शनिने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीची साडेसाती निघून जाईल. तर, 2025 मध्ये कुंभ, मीनसह मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव राहणार आहे. 2025 मध्ये मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा पहिला परिणाम दिसून येईल. तर, कुंभ राशीवर तिसरा आणि मीन राशीवर दुसरा परिणाम राहील. शनिची साडेसाती आर्थिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिकसह करिअरच्या दृष्टीने सुद्धा कष्टाची आणि त्रासदायक असते. या दरम्यान लोकांना कष्ट, प्रगतीत अडथळा, आजार, दुर्घटना यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 


2025 मध्ये 'या' राशींवर शनीची साडेसती असणार 


मेष रास 


मार्च 2025 पासून मेष राशीवर शनीची साडेसाती सुरू होताच अडचणी वाढतील. मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू लागेल. काही मोठे नुकसान होऊ शकते. तसेच उत्पन्न कमी होऊन खर्च वाढेल. याशिवाय शारीरिक समस्याही होतील. हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात. अपघातात गंभीर दुखापत होऊ शकते. जोडीदाराची साथ मिळणार नाही. 


कुंभ रास 


साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभ राशीच्या लोकांना खूप त्रास देऊ शकतो. आर्थिक समस्या निर्माण होतील. नोकरीत पुन्हा-पुन्हा समस्या निर्माण होतील. बदली होईल. सहकाऱ्यांसोबत समस्या निर्माण होतील ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही. व्यवसाय करणाऱ्यांनाही अडचणी येऊ शकतात. खर्च वाढतील. 


मीन रास 


शनीच्या साडेसातीची दुसरी अवस्था अत्यंत क्लेशदायक मानली जाते. मीन राशीवर शनिची सादेष्टी होणारी दुसरी अवस्था संपत्ती आणि करिअरशी संबंधित अनेक समस्या देईल. तब्येत बिघडू शकते. आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. व्यवसायात नुकसान होऊ शकते. नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत राहाल. दुखापत होऊ शकते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 2038 पर्यंत 'या' राशींवर असणार शनिची साडेसाती; एकामागोमाग करावा लागणार संकटांचा सामना