Shani Dev : शनि नेहमी प्रामाणिक लोकांवरच आपला आशीर्वाद कायम ठेवतात. चांगले कर्म करणाऱ्या लोकांवर शनीची कृपा सदैव राहते. शनि जीवनातील शुभ आणि अशुभ कर्मांची नोंद ठेवतो, असं म्हटलं जातं. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे, जो तब्बल अडीच वर्षांनी राशी परिवर्तन करतो.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि (Shani) हा न्यायाचा देव आहे, कर्माचा दाता आहे. कुंडलीतील शनीच्या स्थितीवरून आर्थिक स्थिती निश्चित केली जाते. शनि कर्मानुसार एखाद्या गरिबाला श्रीमंत आणि श्रीमंताला गरीब बनवू शकतो.

धनप्राप्तीशी शनीचा संबंध

शनि हा जीवनातील सर्व प्रकारच्या कृतींचा, कर्मांचा कारक आहे. कुंडलीतील शनीच्या विशेष स्थानामुळे पैसा मिळवणं सोपं किंवा कठीण बनू शकतं. शनीची महादशा 19 वर्ष टिकते. नकारात्मक परिणामांमुळे शनीचा दीर्घकाळ त्रास होतो. जर शनि नकारात्मक असेल तर साडेसाती दारिद्र्य देते. कुंडलीत चांगले योग असूनही माणसाचे कर्म शुभ नसतील तर शनी माणसाला आर्थिक संकटात ढकलतो.

शनि एखाद्या व्यक्तीला श्रीमंत बनवू शकतो. शुभ कर्म केल्यावर शनिदेव धनाचा वर्षाव करतात. असं म्हटलं जातं की, शनि जीवनातील सर्व प्रकारच्या चांगल्या आणि वाईट कर्मांवर लक्ष ठेवतो. मानवी जीवनात कर्माला खूप महत्त्व आहे. माणसाची जशी कर्मं असतात, तसं फळ शनि त्यांना देतो. ज्या व्यक्तीवर शनीची वाईट दृष्टी पडते, त्या व्यक्तीचं जीवन संकटांनी भरलेलं असतं

या विशेष कामांमुळे शनि होईल प्रसन्न

  • स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
  • आपले घर आणि परिसर घाणीपासून दूर ठेवा.
  • काळे हरभरे, काळे तीळ किंवा उडीद, काळे कपडे गरिबांना दान करा.
  • उन्हापासून बचाव करण्यासाठी काळ्या छत्री दान करा.
  • कोणत्याही व्यक्तीचा फायदा घेऊ नका.
  • कोणत्याही व्यक्तीला हानी पोहोचवू नका.
  • झाडं आणि वनस्पतींना इजा पोहोचवू नका.
  • पिंपळाच्या झाडाची विशेष काळजी घ्या.
  • शनिदेवाच्या मंत्राचा जप करा. मंत्र - ओम शम शनैश्चराय नमः

शनि आर्थिक नुकसान कधी करतो?

  • कुंडलीत शनि अशुभ घरात असल्यास
  • शनि सूर्यासोबतच्या राशीत असल्यास
  • कुंडलीत शनि कमजोर असल्यास
  • शनीची साडेसाती किंवा धैय्या चालू असल्यास
  • माणसाचे आचरण शुद्ध नसल्यास

शनि माणसाला धनवान कधी बनवतो?

 

  • कुंडलीत शनि अनुकूल असल्यास
  • कुंडलीत शनि तिसऱ्या, सहाव्या किंवा अकराव्या घरात असल्यास
  • शनि स्वतःच्या घरात असल्यास आणि त्याच वेळी शनिची साडेसाती चालू असल्यास

धनप्राप्तीसाठी शनीचे हे उपाय करा

  • शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावा
  • शनिदेवाच्या तांत्रिक मंत्राचा 108 वेळा जप करा. मंत्र - ओम प्रम प्रेमं स: शनैश्चराय नमः।
  • गरीब व्यक्तीला नाणी दान करा.
  • शनिवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला, संध्याकाळी त्याच झाडाखाली लोखंडी भांड्यात दिवा लावावा.
  • शनि चालिसाचे पठण करा आणि पाठ केल्यानंतर एखाद्या गरीबाला अन्नदान करा, तसेच या दिवशी पुण्यवान राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : शनि 2024 मध्ये 3 वेळा बदलणार आपली चाल; 'या' राशींचं नशीब उजळणार, मिळणार बंपर लाभ