Shani Dev: श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होतोय. हा महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नुकतेच शनिचे संक्रमण देखील झाले आहे. ज्यामुळे काही राशींची साडेसाती समाप्त झाली, तर काहींची सुरू झाली. शास्त्रांमध्ये शनिदेवांना (Shani Dev) भगवान शिवाचे (Lord Shiv) परमभक्त म्हटले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शनिदेव खरी भक्ती करणाऱ्या भक्तावर खूप प्रसन्न होतात. शनिदेवाची पूजा ही विविध दोषांपासून मुक्ती देते आणि महादेवांचा आशीर्वाद देखील देते. जर तुम्ही शनिदेवाच्या आवडत्या वस्तू शिवलिंगावर अर्पण केल्या तर तुम्हाला शनिदोषापासून मुक्तता मिळू शकते. यासाठी श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना दुसरा असूच शकत नाही.
शिवलिंगावर काय अर्पण करावे
धार्मिक मान्यतेनुसार, शनीची महादशा, साडेसाती किंवा ढैय्यामुळे दुःखात राहणाऱ्या लोकांना शनिदेवाच्या आवडत्या वस्तू श्रावणात शिवलिंगावर अर्पण केल्याने शनिदेवाच्या दोषापासून मुक्तता मिळवून देऊ शकतात. यासाठी शनिदेवाशी संबंधित उपाय काय असू शकतात आणि शनिदेवाला काय अर्पण करावे हे जाणून घेऊया.
शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा
जर श्रावणातील प्रत्येक शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केले तर व्यक्ती शनी दोषापासून मुक्त होऊ शकते. शनी देवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा उपाय करून पाहता येईल.
शिवलिंगावर शमीची पाने अर्पण करा
धार्मिक मान्यतेनुसार, शमी वनस्पती शनी देव आणि शिवजींना खूप प्रिय आहे. श्रावणात शनिवारी शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केली तर शनी देव खूप प्रसन्न होतात आणि लोकांना साडेसाती आणि धैय्याच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती देतात.
शिवलिंगावर निळे फूल अर्पण करा
धार्मिक मान्यतेनुसार, निळ्या फुलांचा स्वामी शनि आहे आणि निळे फूल भगवान शिव यांना देखील प्रिय आहेत. अशा परिस्थितीत, श्रावणातील शनिवारी शिवलिंगावर अपराजिता इत्यादी निळे फूल अर्पण केले तर शनी देवाच्या विशेष कृपेने शनी दोषाचा प्रभाव कमी होतो.
मोहरीच्या तेलाचा दिवा लावा
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावणातील शनिवारी शिवलिंगासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर शनी देव खूप प्रसन्न होतील. शनिदोषावर मात करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. शनिदेवाच्या वाईट नजरेपासून वाचवता येते.
शनिदेवाच्या मंत्राचा जप
धार्मिक मान्यतेनुसार, जर तुम्ही शनिदेवाच्या मंत्रांचा जप श्रावण महिन्यात शनिवारी केला तर शनिदेव प्रसन्न होतील आणि लोकांच्या क्रूर नजरेपासून मुक्ती देऊ शकतात. मंत्र आहे - “ओम शं शनैश्चराय नम:” किंवा “ओम प्रम प्रीम प्रौण सह शनैश्चराय नम:” यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप 108 वेळा करा.
हेही वाचा :
Numerology: तरूणपणी नाही, तर वाढत्या वयानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांची संपत्ती वाढते, अगदी कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचे मालक बनतात!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)