Numerology: या जगात अशी अनेक लोक आहेत, ज्यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जाते. पण मेहनत आणि नशीबाच्या जोरावर ते लोक पुढे इतके श्रीमंत बनतात की सर्वांना त्यांचा हेवा वाटतो. आयुष्यात कितीही मोठी यशाची शिडी चढले तरी त्यांचे पाय जमीनीवरच राहतात. कारण त्यांच्या बालपणात त्यांनी जे काही दिवस पाहिले किंवा अनुभवले असतात, ते कधीही विसरत नाहीत, अंकशास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारीख किंवा मूलांकाबद्दल सांगणार आहोत, ज्यांना बालपणी गरिबीचा सामना करावा लागतो, पण त्यानंतर आयुष्यभर पैशाशी खेळतात. जाणून घ्या..

बालपण गरिबीत, नंतर पैशाशी खेळतात 'या' जन्मतारखेचे लोक!

अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक शाखा आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे भविष्य त्याच्या जन्मतारखेच्या आधारे कळू शकते. जन्मतारीख ही आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची मानली जाते.  अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. या संख्येचा स्वामी गुरु बृहस्पति आहे. त्यांना मुले, ज्ञान, शिक्षण, मोठा भाऊ आणि धार्मिक कार्यांचा कारक मानले जाते. असे मानले जाते की त्यांच्या या स्वभावाचा या संख्येच्या लोकांवरही परिणाम होतो. 3 क्रमांकाच्या लोकांचे भाग्य कसे असते? ते जाणून घेऊया.

असे लोक दूरदृष्टी असलेले असतात...

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचे मूलांक 3 असते, ते लोक धाडसी, संघर्षशील असतात आणि समस्यांना तोंड देऊन कधीही हार मानत नाहीत. त्यांना कोणाचीही मर्जी घेणे आवडत नाही किंवा त्यांच्या कामात इतरांचा हस्तक्षेप आवडत नाही. त्यांना कोणासमोर डोके टेकवणे आवडत नाही. ते स्वाभिमानी असतात. एकदा ते एखादे काम करण्याचा निर्णय घेतात की ते ते पूर्ण करतात. असे लोक दूरदृष्टी असलेले असतात आणि संभाव्य घटना आधीच ओळखू शकतात.

सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता अधिक?

अंकशास्त्रानुसार, जर आपण मूलांक 3 असलेल्या लोकांच्या कार्यक्षेत्राबद्दल बोललो तर त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असते. ते पोलिस, प्रशासकीय अधिकारी, बँक अधिकारी किंवा धार्मिक विद्वान बनतात. या मूलांकाचे लोक त्यांच्या कामात कुशल असतात. ते शिक्षक, लेखक, सेल्समन आणि प्राध्यापक देखील असू शकतात. त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे ते यशाच्या शिडीवर चढतात आणि जीवनात यश मिळवतात.

वयानुसार आर्थिक स्थिती सुधारते

अंकशास्त्रानुसार, जर आपण त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर सुरुवातीला त्यांना कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागते. पण जसजसे ते मोठे होतात तसतसे त्यांची आर्थिक स्थिती सुधारत राहते. अशा लोकांकडे उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग असतात. ज्यामुळे ते एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांनी कमाई करत राहतात. अनेक वेळा त्यांना मालमत्तेबाबतच्या खटल्यातही अडकावे लागते.

भावंडांशी घट्ट नाते, मित्राकडून विश्वासघात होण्याची भीती

अंकशास्त्रानुसार, 3 या अंकाच्या लोकांचे त्यांच्या भावंडांशी खूप घट्ट नातेसंबंध असतात. त्यांना त्यांच्या अडचणीत असलेल्या भावंडांकडून मदत मिळते. त्यांचे मित्र मोठ्या संख्येने असतात. त्यांना त्यांच्या पालकांकडून विशेष प्रेम मिळते. अशा लोकांना कडक शिस्त आवडते. ते इतरांशी विनम्र आणि मैत्रीपूर्ण असतात. त्यांना मित्राकडून विश्वासघात होण्याची भीती नेहमीच असते.

वैवाहिक जीवन उत्तम, पण प्रेमात मिळतो धोका!

अंकशास्त्रानुसार, 3 या मूलांकाच्या लोकांचे प्रेमसंबंध कायमचे नसतात. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असते. त्यांना धार्मिक कार्यात खूप रस असतो. त्यांचा छंद तीर्थक्षेत्रांना भेट देणे आहे. जर आपण अशा लोकांच्या आरोग्याबद्दल बोललो तर त्यांना अनेकदा पाय, कंबर, त्वचा आणि पोटाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते.

हेही वाचा :           

Numerology: तरूणपणी नाही, तर वाढत्या वयानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांची संपत्ती वाढते, अगदी कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचे मालक बनतात!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)