Maharashtra Weather Update :  राज्यातील बहूतांश भागात पावसाचा जोर वाढताना दिसत असून अनेक ठिकाणी पावसाच्या सारी कोसळत आहे. अशातच मराठवाड्यासह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासह तळ कोकणासह मुंबई आणि उपनगरात पुढील चारही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यातही पावसाचे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain Update)

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातल्या बहुतांश भागात रात्रभर पावसाने धुवाधार बॅटिंग केली आहे. मात्र पहाटेपासून सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणातल्या काही भागात मात्र सरीवर सरी कोसळत असल्याचे दिसून आले आहे. तर आज देखील मुसळधार पावसाच्या इशारा हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य इशारा लक्ष्यात घेता मुसळधार पावसामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तर तिकडे पालघरला आजही येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. तर असून अधून मधून पावसाची रिपरिप देखील सुरू आहे.

विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट

दरम्यान, आज (23 जुलै) हवामान विभागाने विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी हवामान विभागाने उद्या म्हणजेच 24 जुलै रोजी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवसात विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट

23 जुलै : ऑरेंज अलर्ट - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर -सातारा -पुणे घाटमाथायलो अलर्ट- मुंबई, ठाणे, पालघर,नाशिक घाटमाथा,यवतमाळ ,चंद्रपूर, गडचिरोली24 जुलै : ऑरेंज अलर्ट - ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली,पुणे -सातारा - कोल्हापूर घाटमाथायलो अलर्ट - मुंबई, पालघर, नाशिक घाटमाथासह वाशिम ,बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा25 जुलैः ऑरेंज अलर्ट - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,भंडारा, पुणे - सातारा - कोल्हापूर घाटमाथायलो अलर्ट : मुंबई ,ठाणे, संपूर्ण विदर्भ,हिंगोली नांदेड

गोसेखुर्द धरणाचे 9 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले, 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस यासोबत संजय सरोवर आणि धापेवाडा बॅरेज मधून सोडण्यात येतं असलेल्या पाण्यामुळं गोसेखुर्द धरणाच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं धरणाचे ९ दरवाजे अर्धा मीटरनं उघडले आहेत. त्यातून ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्यानं पाऊस पडत राहिल्यास आणि वैनगंगा नदीच्या पाणी पत्रात वाढ झाल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्यात येणारं असल्याची शक्यता धरण प्रशासनानं व्यक्त केली आहे.

हे हि वाचा