Shani Dev: हिंदू धर्मात शनिदेवाचे स्थान खूप महत्वाचे आहे. ज्योतिष शास्त्रात असेही सांगितले आहे की, शनिदेव ही न्यायाची देवता आहे. असे मानले जाते की शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करतात. चांगले कर्म करणाऱ्यावर शनिदेवाचा आशीर्वाद राहतो आणि वाईट कर्म करणाऱ्यावर. त्यांच्यावर शनिदेवाचा कोप होतो, अशी धारणा आहे. शास्त्रानुसार शनिदेव हे सूर्य आणि देवी छाया यांचे पुत्र आहेत. धार्मिक मान्येतनुसार शनिदेवांना त्यांच्या पत्नीकडून एक क्रूर ग्रह होण्याचा शाप मिळाला होता. शनिदेवांचा रंग सावळा आहे आणि त्यांचे वाहन कावळा आहे. आज आम्ही तुम्हाला शनिदेवांच्या प्रभावी 6 मंत्रांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा जप केल्याने तुमचे संकट दूर होईलच, पण शनिदेवांची खास कृपा तुमच्यावर राहील.
दर शनिवारी प्रभावी मंत्रांचा करा जप..
धार्मिक मान्यतेनुसार, दर शनिवारी श्री शनिदेवाच्या या विशेष मंत्रांचा जप केल्याने कीर्ती, सुख, समृद्धी, कीर्ती, शौर्य, वैभव, यश आणि अपार संपत्ती सोबतच प्रगतीचे दरवाजे उघडतात. येथे दिलेल्या कोणत्याही मंत्राचा किमान 1 जपमाळ म्हणजेच 108 वेळा जप करा. कोणताही एक मंत्र निवडा आणि त्याचा जप करा. शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदा राहील.
शनिदेवांचा बीज मंत्र
शं शनैश्चराय नम:
शनिदेवांचा वेदोक्त मंत्र
ॐ शमाग्निभि: करच्छन्न: स्तपंत सूर्य शंवातोवा त्वरपा अपास्निधा:
श्री शनि व्यासविरचित मंत्र
ॐ नीलांजन समाभासम्। रविपुत्रम यमाग्रजम्।
छाया मार्तण्डसंभूतम। तम् नमामि शनैश्चरम्।।
शनि पुराणोक्त मंत्र
सूर्यपुत्रो दीर्घेदेही विशालाक्ष: शिवप्रिय: द
मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:
शनि स्तोत्र
नमस्ते कोणसंस्थाचं पिंगलाय नमो एक स्तुते
नमस्ते बभ्रूरूपाय कृष्णाय च नमो ए स्तुत
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो
नमस्ते मंदसज्ञाय शनैश्चर नमो ए स्तुते
प्रसाद कुरू देवेश दिनस्य प्रणतस्य च
कोषस्थह्म पिंगलो बभ्रूकृष्णौ रौदोए न्तको यम:
सौरी शनैश्चरो मंद: पिप्लदेन संस्तुत:
एतानि दश नामामी प्रातरुत्थाय ए पठेत्
शनैश्चरकृता पीडा न कदचित् भविष्यति
तंत्रोक्त मंत्र-
ॐ प्रां. प्रीं. प्रौ. स: शनैश्चराय नम:
हेही वाचा>>>
Shani Dev: शनिदेवांच्या आवडत्या राशी माहितीयत? त्यांच्या कृपेने जीवनात रातोरात होतात बदल! तुमची राशी त्यात आहे का? एकदा पाहाच..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )