Sarpanch Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात या घटनेचे एकच पडसाद उमटल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर पोलिसांच्या तपासावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि अनेक लोक प्रतिनिधी आता तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी केली होती. अशातच या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता या मागणीनुसार अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे वर्ग झाला आहे. याप्रकरणी केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन केले आहे. तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल बीडचे पोलीस अधीक्षक यांनी पाठवला आहे.

Continues below advertisement

बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश

संतोष देशमुख हे मस्साजोग येथील महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. दुपारी अज्ञात काही व्यक्तींनी त्यांचं अपहरण केले होते. संतोष देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीचे जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी केज पोलीस ठाण्यात गर्दी केली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली होती.  सध्या मस्साजोग परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच  प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. 

संतोष पंडितराव देशमुख

वय 45 वर्ष रा मस्साजोग ता केज जि बीड.

Continues below advertisement

राजकीय कारकीर्द

2012 ते 2017  उपसरपंच2017 ते 2022     सरपंच2022 ते आजपर्यंत.  सरपंच

पंकजाताई मुंडे, प्रकाश सोळंके यांचीही मागणी

बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद जिल्हाभरात पाहायला मिळाले. ही घटना घडल्यानंतर नुकतेच आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत. आणि सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात एसआयटी स्थापन करा, अशी मागणी सोळंके यांनी केली होती.

मस्साजोग येथील सरपंचाचा खून आणि परळीतील तरूण व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी केली होती. जिल्हयात घडणाऱ्या अशा घटनां विषयी आ. पंकजाताईंनी चिंता व्यक्त केली असून याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा