Shani Dev: ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे कर्माचे दाता म्हटले जातात, ते व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात, जुलै मध्ये कमाल दाखवल्यानंतर ऑगस्ट महिन्यातही शनिदेव अॅक्शन मोडमध्ये असतील. तर शुक्र हा धन आणि समृद्धी प्रदान करणारा शुभ ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही शुभ ग्रह एकमेकांचे मित्र असल्याचे म्हटले जाते. अशात दोन्ही मित्रांच्या मिलनामुळे काही राशींचे भाग्य सुधारण्याची अपेक्षा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 23 ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह आपल्या मित्र शनीच्या 'घरी' जाणार आहे, यामुळे 3 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल, त्यांना भरपूर संपत्ती मिळेल. जाणून घेऊया त्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत...
तब्बल 50 वर्षांनंतर मित्र भेटणार..!
तब्बल 50 वर्षांनंतर 23 ऑगस्ट रोजी शुक्र शनीच्या पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे, इतर ग्रहांप्रमाणे शुक्र देखील नियमितपणे नक्षत्रांमध्ये संक्रमण करतो आणि बदलतो. तर शनि या नक्षत्राचा स्वामी मानला जातो. तो न्यायाचा देव आहे आणि व्यक्तीला कर्मानुसार योग्य फळ देतो.
पुष्य नक्षत्रात शुक्राच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना फायदा होईल?
तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार, 23 ऑगस्ट नंतर नोकरीत सुरू असलेल्या समस्या दूर होतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांचा नफा वाढू लागेल. बॉस तुमच्या कामावर खूश होतील. ते तुम्हाला काही मोठी जबाबदारी देऊ शकतात. घरातील वातावरण आनंददायी असेल आणि त्रास दूर होतील.शुक्राच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी शक्यतांचे दरवाजे उघडू शकतो. तुमची आर्थिक स्थिती सुधारू लागेल. तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांना जीवनातील सर्व सुखे मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत डेटवर जाऊ शकता. समाजात तुमचा आदर वाढेल. तुम्हाला सामाजिक संस्थेत मोठे पद मिळू शकते.
कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राच्या नक्षत्रातील बदल या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. तुमच्या मुलाकडून त्याच्या अभ्यासाबाबत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या पॅकेजसह ऑफर लेटर मिळू शकते.
हेही वाचा :
Numerology: मागच्या जन्माचं कर्ज या जन्मी फेडतातच, 'या' जन्मतारखेच्या लोकांना कर्मांचं फळ भोगावंच लागतं, यातून सुटका नसते, अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)