Shefali Jariwal Husbnad Parag Tyagi Post Viral: 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाच्या निधनानं (Shefali Jariwal Passed Away) सर्वांनाच धक्का बसला. शेफालीच्या अचानक झालेल्या निधनानं प्रत्येकजण हादरला. निधन होऊन जवळजवळ एक आठवडा उलटला असला तरीसुद्धा शेफालीच्या (Shefali Jariwal) मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी शेफालीनं जगाचा निरोप घेतला.  अशातच शेफालीच्या निधनानंतर अवघ्या आठवडा भरानं तिचा पती पराग त्यागीनं एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. पराग त्यागीची पोस्ट वाचून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतील. पराग त्यागीनं पोस्टमध्ये लिहिलंय की, ती 'सर्वांची आई' होती. याशिवाय, त्यांनी चाहत्यांना अफवांपासून दूर राहण्याची विनंती देखील केली आहे.

पराग त्यागीनं पोस्टमध्ये काय म्हटलंय? 

पराग त्यागी (Parag Tyagi) आपल्या लाडक्या पतीला परी म्हणायचा. त्यानं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "शेफाली, माझी परी - एकमेव कांटा लगा गर्ल - जी आपल्या डोळ्यांसमोर दिसायची, त्यापेक्षाही कित्येकपटींनी जास्त होती. ती ग्रेसमध्ये असलेली आग होती, शार्प, फोकस आणि प्रेरित. एक अशी महिला जी हेतूनं जगली, तिचं करिअर, तिचं मन, तिचं शरीर आणि तिच्या आत्म्याला शांत शक्ती आणि अटल दृढनिश्चयाने जोपासायची."

बायकोच्या निधनानं पुरता कोसळलेला पराग पुढे लिहितो की, "पण तिला मिळालेले सर्व टायटल्स आणि अचिव्हमेंट्सच्या पलीकडे, शेफाली प्रेमाचं सर्वात निस्वार्थी रूप होती. ती सर्वांची आई होती. नेहमीच इतरांना प्राधान्य देणारी. तिच्या उपस्थितीनंच आपलेपणा आणि सांत्वन करणारी. एक उदार मुलगी. एक समर्पित आणि प्रेमळ पत्नी आणि सिम्बाची एक अद्भुत आई. एक प्रोटेक्टिव्ह आणि मार्गदर्शक बहीण आणि मावशी. एक अत्यंत निष्ठावंत मैत्रीण जी धैर्यानं आणि करुणेनं तिच्या प्रियजनांच्या पाठीशी उभी राहायची..."

"या दुःखद प्रसंगी, आवाज आणि अफवांवर विश्वास ठेवणं सहाजिक आहे. पण, शेफालीला तिच्या आठवणींमध्ये आपण जपलं पाहिजे. जशी ती इतरांसोबत वागायची, तिनं सर्वांना जो आनंद दिलाय, तिनं अनेकांना त्यांच्या आयुष्यात सावरण्यास मदत केलीय. मी या थ्रेडची सुरुवात एका सामान्य प्रार्थनेनं करतोय. ही जागा फक्त प्रेमानं भरलेली असावी. बरं करणाऱ्या आठवणींसह. तिच्या आत्म्याला जिवंत ठेवणाऱ्या कथांसह. तिचा हा वारसा असू द्या - एक तेजस्वी आत्मा, ती कधीही विसरली जाणार नाही. तुला कायम प्रेम." 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shefali Jariwala Net Worth: शेफालीचा फक्त एकच हिट अल्बम, तरीसुद्धा कोट्यवधींचं नेटवर्थ; आता वारस कोण?