Astrology Panchang Yog 4 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 4 जुलै 2025 म्हणजेच आजचा वार शुक्रवार. आजचा दिवस हा देवी लक्ष्मीला आपण समर्पित करतो. भक्त देवीची आराधना करतात. देवीची सेवा करतात. तसेच, आज चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. आजच्या दिवशी चित्रा नक्षत्रात शिव योगाचा (Yog) उत्तम संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक राशींसाठी फार खास असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुमच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, समजुतदारीने व्यवहार कराल. आज कोणताही निर्णय घेतानाघरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घेऊनच घ्या. आज कोणाकडूनही जास्तीची अपेक्षा ठेवू नका. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या वातावरणाचा अनुभव घेता येईल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे.आज तुम्हाला तुमच्या कामात चांगलं यश मिळेल. तसेच, समाजात तुमच्या कामाचं फार कौतुक केलं जाईल. यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चांगले बदल घडतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सुखाचा असणार आहे.आज तुम्हाला तुमच्या कामातून समाधान मिळेल. तसेच, तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल दिसून येतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात मन रमेल. करिअरचा उंच टप्पा गाठण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच, वैवाहिक जीवन सुखकर होईल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील गोष्ट इतरांशी शेअर करा. 

कुंभ रास (Aquaris Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार सौभाग्याचा असणार आहे. आज तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, सगळी कामे तुमच्या मनाप्रमाणे घडतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. समाजात तुमच्या नावाचं फार कौतुक केलं जाईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :  

Horoscope Today 4 July 2025 : आज शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी लकी! देवी लक्ष्मी करणार संकटातून सुटका, हातात खेळणार पैसा; आजचे राशीभविष्य