Shadashtak Yog 2025 : वैदिक शास्त्रानुसार, सौरमालेतील सर्व नवग्रह ठराविक वेळेच्या अंतराने संक्रमण करतात. ग्रहांच्या या संक्रमणामुळे अनेक शुभ योग-अशुभ योग (Yog) निर्माण होतात. आता 20 जून रोजी मंगळ आणि शनी एकमेकांच्या 150 डिग्री अंतरावर असणार आहेत. ज्योतिष शास्त्रात या स्थितीला षडाष्टक योग म्हणतात. यामुळे व्यक्तीला दु:खाचा, संकटांचा सामना करावा लागतो. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Horoscope)
षडाष्टक योगामुळे तूळ राशीच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, यामुळे अनेक अशुभ योगदेखील जुळून येणार आहे. त्यामुळे या दरम्यान तुम्ही वेळोवेळी सावध राहण्याची गरज आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुम्हाला दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. धनहानीदेखील होऊ शकते. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका. तसेच, कुठेही गुंतवणूक करु नका.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी शनी-मंगळाची युती फार अशुभ ठरणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा फार प्रतिकूल काळ ठरु शकतो. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचे वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणावाचा देखील सामना करावा लागू शकतो. या दरम्यान जर तुम्ही वाहन चालवत असाल तर त्याचा जपून वापर करा. या काळात मित्रपरिवाराबरोबर व्यवहार करताना सांभाळून करा. तसेच, आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग फार नुकसानकारक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीवर नियंण ठेवण्याची गरज आहे. यासाठी पैशांचा जपून वापर करा. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायात तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तसेच, कामाच्या ठिकाणी बॉस तुमच्या कामावर नाराज होऊ शकतो. त्यामुळे या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :