वरिष्ठांचे सहकार्य मिळेल
आज तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता आज काही बाहेरचे व्यक्ती तुमच्या वैयक्तिक समस्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल. कारण, त्या व्यक्तीमुळे तुमच्या कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. व्यवसायात नवीन पद्धतींचा अवलंब करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेता येईल.
राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल
आज तुम्हाला प्रत्येक कामात उत्सुकता वाटेल. नोकरदार वर्गाच्या इच्छा पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटू शकता, त्यांच्याबरोबर बालपणीच्या आठवणी ताज्या करा. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना करा. तिथे सर्वजण खूप आनंदी असतील. संध्याकाळचा वेळ मुलांसोबत घालवा. तुम्हाला खूप आनंद होईल, ज्यामुळे तुम्हाला अधिक ताजेतवाने वाटेल.
वृश्चिक राशीचे आजचे आरोग्य
आज तुमची तब्येत ठीक राहील. पण, तुम्हाला अस्वस्थ वाटेल. सतत ताप येईल असे वाटत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय
संकटमोचन हनुमानाची पूजा करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :