Saturn Transit 2022 : तब्बल 29 वर्षांनी शनी कुंभराशीत प्रवेश करणार आहे, यामुळे देश, राज्य आणि जागतिक पातळीवर याचा परिणाम जाणवेल असा दावा ज्योतिष अभ्यासक डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी यांनी केला आहे, काय सांगतात ज्योतिष अभ्यासक? जाणून घ्या
29 एप्रिल ते 12 जुलै या कालावधीत शनी भ्रमंती
29 एप्रिलला सकाळी 8 वाजता मकर राशीतून कुंभ राशीत म्हणजेच शनीचा स्वराशीत प्रवेश होणार आहे. 12 जुलै 2022 पर्यंत कुंभ राशीत शनीचे भ्रमण आहे, त्यानंतर वक्री होऊन पुन्हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. 16 जानेवारी 2023 पासून पुन्हा शनीचा कुंभ राशीत होणार प्रवेश आहे, अशाप्रकारे 29 एप्रिल ते 12 जुलै या कालावधीत शनीच्या भ्रमंतीचा ट्रेलर पाहता येईल, असा अभ्यासकांचा दावा आहे.
राज्याच्या राजकारणावर काय होणार परिणाम?
शनीच्या विविध राशीत भ्रमंतीमुळे राज्याच्या राजकारणावर परिणाम जाणवू शकतात, अस्थिरता अधिकच वाढत जाईल, त्यामुळे ठाकरे सरकारने नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असा सल्ला ज्योतिष अभ्यासक नरेंद्र धारणे यांनी दिला आहे.
शनीची भ्रमंती राज ठाकरेंसाठी शुभ संकेत देणारी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रभाव वाढविणारा कालावधी आहे, शनीची भ्रमंती राज ठाकरेंसाठी शुभ संकेत देणारी असून सत्तेच्या राजकारणाजवळ घेऊन जाणारी आहे. देवेंद्र फडणवीस यांना 16 जानेवारी 2023 नंतरचा कालावधी लाभदायक असून सत्तेच्या जवळ घेऊन जाणारा असल्याचं अभ्यासकांचं मत आहे.
कुंभ, वृषभ, तुला, मकर राशीला शनीची भ्रमंती लाभदायक
शनी भ्रमंतीमुळे भारत जागतिक पातळीवर सबल बनेल, शेअर मार्केट उच्चांकी पातळी गाठेल, देशाच्या आर्थिक स्थितीवर शुभ परिणाम होणार असून उद्योग व्यवसायांसाठी उत्तम कालावधी आहे, जागतिक पातळीवर पाहायला गेलं तर युक्रेन रशिया युद्धाची धार कमी होईल, समन्वय वाढेल, जागतिक महायुद्ध घडण्याची शक्यता कमी आहे.
कोरोना सारख्या महामारीचा भारतावर परिणाम जाणवणार नाही
शनीच्या विविध राशीत भ्रमंतीमुळे कोरोना सारख्या महामारीचा भारतावर परिणाम जाणवणार नाही असा विश्वास व्यक्त होतं आहे.
शनी देवाचा स्वराशीतील प्रवेश वैश्विक पातळीवर परिणाम करणारा
- युक्रेन रशिया युध्दाची धार कमी करणारा
- जागतिक महायुध्दाची परिस्थिती नाही
- देशाला उन्नतीकडे घेऊन जाणारा
- शेअर बाजारात उच्चांकी पातळी गाठणारा
- उद्योग व्यवसायांना चालना देणारा
- महाराष्ट्रावर मात्र अस्थिरतेचे सावट कायम ठेवणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि शरद पवार यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी
- राज ठाकरे यांचा राज्याच्या राजकारणवर प्रभाव वाढणार
- देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी जानेवारी 23 नंतरचा शुभ काळ
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :