Shaniwar Upay : शनिवार (Saturday) हा दिवस काही खास आहे. हा दिवस भैरवदेवाला आणि शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. सर्व दु:ख आणि समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवार हा महत्त्वाचा समजला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या जीवनात चांगल्या कर्माचं फळ देणारा आणि वाईट कर्मांची शिक्षा देणारा हा शनि आहे.
असं म्हणतात की, ज्याच्या पत्रिकेत शनि चांगला असेल त्याला राजेशाही सुख मिळतं. मात्र शनिवारी केलेल्या काही चुकांमुळे शनि नाराज होतो आणि सर्व कामात अडथळे निर्माण करतो. शनिवारी काही गोष्टी अजिबात खरेदी करू नये, या गोष्टी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
शनिवारी चुकूनही 'या' वस्तू खरेदी करू नका
- लोखंड हा शनिदेवाचा धातू मानला जातो, त्यामुळे या दिवशी चुकूनही लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत. जर तुम्ही शनिवारी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू विकत घेतल्या तर तुम्हाला जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुमची आर्थिक बाजूही डळमळीत होऊ शकते, त्यामुळे चुकूनही शनिवारी लोखंड खरेदी करू नका.
- शनिवारी कोणी मीठ देखील खरेदी करू नये. जर तुम्ही शनिवारी घरात मीठ आणलं तर कुटुंबात नकारात्मकता पसरू शकते. यासोबतच या दिवशी शेजाऱ्यांकडून देखील मीठ मागू नये.
- शनिवारच्या दिवशी धारदार वस्तू जसं की सुया, कात्री, चाकू इत्यादी खरेदी करून घरी आणू नये. असं केल्याने तुमच्या कुटुंबातील वातावरण खराब होऊ शकतं. जर तुम्ही शनिवारी या गोष्टी खरेदी केल्या तर कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. याशिवाय घरातील लोकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शनिवारी चुकूनही धारदार वस्तू खरेदी करू नका.
- शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी करणं देखील शुभ मानलं जात नाही. जर तुम्ही या दिवशी शूज आणि चप्पल खरेदी केली तर तुम्हाला धनसंपत्ती जमा करण्यात अडचणी येऊ शकतात.
- शनिवारच्या दिवशी दिवशी झाडू खरेदी करणंही टाळावं.
- काळा रंग शनि शनिदेवाशी संबंधित मानला जातो, त्यामुळे शनिवारी काळ्या रंगाचे कपडे कधीही खरेदी करू नयेत. या दिवशी काळ्या रंगाचे कपडे खरेदी केल्यास तुम्हाला अनेक मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
- शनिवारी शनिदेवाच्या पूजेदरम्यान त्यांना मोहरीचे तेल अर्पण केलं जातं, त्यामुळे शनिवारी कधीही मोहरीचं तेल खरेदी करू नये. तेल खरेदी केल्याने केवळ शनिदेव नाराज होत नाहीत, तर त्याचा तुमच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: